आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानावरून वाद:कॉमेडियन वीर दासविरुद्ध गुन्हा दाखल, अमेरिकेतील लाईव्ह शोमध्ये भारताची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप; आता दिले स्पष्टीकरण...

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घ्या नेमके प्रकरण काय आहे?

प्रसिद्ध कॉमेडियन वीर दास त्याच्या भारतविरोधी वक्तव्यामुळे अडचणीत आला आहे. सोशल मीडियावर त्याला प्रचंड विरोध होत असून, त्याच्याविरोधात पोलिसांत दोन तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. वीर दासने वॉशिंग्टन डीसी येथील जॉन एफ केनेडी सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्समधील त्याच्या परफॉर्मन्सचा व्हिडिओ त्याच्या यूट्यूब चॅनलवर शेअर केल्यावर वाद सुरू झाला.

सहा मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये वीरने अमेरिकेतील लोकांसमोर भारतातील लोकांच्या दुहेरी स्वभावाचा उल्लेख केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक संतापले असून त्याच्यावर परदेशात भारताची प्रतिमा मलीन केल्याचा आरोप होतोय.

कॉमेडियनविरोधात तक्रार दाखल
भाजपचे कायदेशीर सल्लागार आणि मुंबई उच्च न्यायालयाचे वकील आशितोष दुबे यांच्याकडून मुंबई पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीय. तर दुसरी तक्रार दिल्लीतल्या टिळक मार्ग पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलीय. आशुतोष दुबे यांनी सोशल मीडियावर प्रत शेअर करत लिहिले की, "मी अमेरिकेत भारताची प्रतिमा मलीन केल्याबद्दल कॉमेडियन वीर दास विरुद्ध मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्याने भारत, भारतीय महिला आणि भारताच्या पंतप्रधानांविरुद्ध जाणूनबुजून चिथावणीखोर कृती केली आहे.' अपमानास्पद विधाने केली."

वीर दास सध्या अमेरिकेत आहेत. अलीकडेच, त्याने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर 'आय कम फ्रॉम टू इंडियाज' नावाचा व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये वीर दासने भारतातील प्रचलित गोष्टींवर व्यंगात्मक टिप्पणी केली आहे. "मी अशा भारतातून आलो आहे जिथे मास्क घातलेली मुले एकमेकांचा हात धरतात आणि जिथे नेते मास्कशिवाय एकमेकांना मिठी मारतात. मी अशा भारतातून आलो आहे जिथे आपण बॉलिवूडवरून विभागल्याचा दावा ट्विटरवर करतो आणि आणि थिएटरच्या अंधारात बॉलिवूडमुळे एकत्र आहोत," अशी त्याच्या कवितेची सुरुवात आहे. यासोबतच या कवितेतील 'मी त्या भारतातून येतो, जिथे आम्ही दिवसा महिलांची पूजा करतो आणि रात्री सामूहिक बलात्कार' अशी एक ओळ वादात अडकलीय.

देशाची प्रतिमा मलिन करणाऱ्या शब्दांमुळे वीर दासवर आता कडाडून टीका होत आहे. लोक त्याला 'देशद्रोही' म्हणत आहेत. एवढेच नाही तर भाजप कार्यकर्त्या प्रीती गांधी यांनीही हा व्हिडिओ शेअर करून आपला संताप व्यक्त केला आहे. देशाबद्दलचे हे विधान घृणास्पद आणि मूर्खपणाचे असल्याचे त्यांनी लिहिले आहे. वाद वाढत असल्याचे पाहून वीर दासने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून स्पष्टीकरण दिले आहे.

कॉमेडियनने केला खुलासा
वीर दासने पोस्ट शेअर करून लिहिले की, आपल्या देशाचा अपमान करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. या व्हिडिओत आपण लोकांच्या विचारांसंबधी भाष्य करत असल्याचे वीरदासने म्हटले आहे. 'एकाच विषयावर दोन वेगवेगळे विचार मांडणाऱ्या लोकांबद्दल व्हिडिओमध्ये भाष्य करण्यात आले आणि हे कोणतेही रहस्य नाही, ही गोष्ट सगळ्यांच्याच परिचयाची आहे' असेही वीर दासने म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...