आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्फर्म:अभिनेता रणबीर कपूरला कोरोनाची लागण, घरातच क्वारंटाइन; आई नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर दिली माहिती

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रणबीरचा कोविड 19 चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

अभिनेता रणबीर कपूरला कोरोनाची लागण झाल्याची चर्चा माध्यमांमध्ये सुरु होती. मात्र आता या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळाला आहे. रणबीरची आई आणि अभिनेत्री नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत रणबीरला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले आहे. त्यांनी लिहिले, रणबीरला कोविड 19 ची लागण झाली आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती सुधारत आहे. तो घरात क्वारंटाइन असून योग्य ती काळजी घेतोय, असे त्यांनी सांगितले आहे. सोबतच नीतू यांनी सर्व चाहत्यांचे प्रेमाबद्दल आभारदेखील व्यक्त केले आहेत.

काका रणधीर कपूर म्हणाले होते - कोरोना झाला की नाही हे माहित नाही

यापूर्वी रणबीरचे मोठे काका रणधीर कपूर यांनी रणबीर आजारी असल्याचे एका न्यूज वेबसाइटशी बोलताना सांगितले होते. मात्र यावेळी त्यांनी रणबीरला कोरोनाचा लागण झाली की नाही हे स्पष्ट केले नव्हते. यावेळी रणबीरला कोरोना झाला आहे का? या प्रश्नावर त्यांनी आधी “होय” असे उत्तर दिले. मात्र रणबीरला कोरोना झालाय की नाही याची खात्री नसल्याचे ते लगेचच म्हणाले. रणबीर सध्या आजारी आहे आणि तो आराम करत आहे. मात्र त्याला कोरोना झालाय की नाही हे माहित नसल्याचे त्यांनी सांगितले होते.

काही महिन्यांपूर्वी रणबीरची आई आणि अभिनेत्री नीतू कपूर यांना जुग जुग जियो या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान कोरोनाची लागण झाली होती. त्यांचा को-स्टार वरुण धवन याचाही कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. नीतू आणि वरुण यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना ही बातमी दिली होती.

'ब्रह्मास्त्र' आणि 'अ‍ॅनिमल'मध्ये झळकणार रणबीर

रणबीरच्या व्यावसायिक आयुष्याविषयी बोलायचे तर, तो ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्यासोबत झळकणार आहेत. याशिवाय तो ‘अ‍ॅनिमल’मध्येही दिसणार आहे, त्यात त्याच्यासोबत परिणीती चोप्रा, बॉबी कपूर आणि अनिल कपूर आहेत. याशिवाय दिग्दर्शक लव्ह रंजनच्या अद्याप शीर्षक न ठरलेल्या चित्रपटातही रणबीर झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासह श्रद्धा कपूर दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...