आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कन्फर्म:'बिग बॉस 7'ची विजेती गौहर खानचा 12 वर्षांनी लहान बॉयफ्रेंड झैद दरबारसोबत झाला साखरपुडा; फोटो शेअर करुन झैद म्हणाला - 'तिने होकार दिला'

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विशेष म्हणजे झैद गौहरपेक्षा 12 वर्षांनी लहान आहे.

'बिग बॉस 14' या रिअॅलिटी शोमध्ये तूफानी सीनिअर म्हणून झळकलेली गौहर खान सध्या झैद दरबारसोबतच्या आपल्या नात्यामुळे चर्चेत आहे. गौहर आणि झैद येत्या डिसेंबर महिन्यात लग्न करणार असल्याचेही म्हटले गेले, मात्र गौहरने या वृत्ताचे खंडन केले होते. पण आता स्वतः तिने आपल्या चाहत्यांना सरप्राइज देत बॉयफ्रेंड झैद दरबारसोबत साखरपुडा केल्याची घोषणा केली आहे.

झैद दरबार हा प्रसिद्ध संगीतकार इस्माईल दरबार यांचा मुलगा आहे. तो स्वत: एक डान्स कोरिओग्राफर आणि इन्फ्लुएंसर आहे. अलीकडेच त्याने गौहरसोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करुन तिने लग्नाला होकार दिला असल्याचे म्हटले आहे. यासोबतच त्याने कॅप्शनमध्ये एंगेजमेंट रिंग इमोजीही शेअर केला आहे.

View this post on Instagram

💍♥️ @gauaharkhan

A post shared by Zaid Darbar (@zaid_darbar) on Nov 4, 2020 at 9:38pm PST

बिग बॉसच्या सातव्या पर्वाची विजेती असलेल्या गौहर हिने देखील तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती झैद दरबारसोबत दिसत आहे. तिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे तर झैदने पिवळ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. या फोटोमध्ये ते दोघे एकमेकांकडे बघत असल्याचे दिसत आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिचे अभिनंदन केले आहे.

झैदसोबत 24 डिसेंबर रोजी लग्न करणार गौहर
नुकत्याच आलेल्या स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार गौहर खान यावर्षी 24 डिसेंबरला प्रियकर झैदसोबत लग्न करणार आहे. हे लग्न मुंबईत होणार आहे ज्यात काही मोजके जवळचे नातेवाईक आणि मित्रच उपस्थित राहतील. दोन्ही कुटुंबांनी लग्नाची तयारी सुरू केली आहे. विवाहाचे सर्व विधी तीन दिवस चालतील. गौहरची बहीण निगार खान आणि कुटुंबीय लवकरच दुबईहून भारतात येणार आहेत. विशेष म्हणजे झैद गौहरपेक्षा 12 वर्षांनी लहान आहे.