आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्फर्म:'सीता' चित्रपटात करीना कपूर नव्हे तर कंगना रनोट साकारणार सीतेची भूमिका, दिग्दर्शक म्हणाले - हा चित्रपट पौराणिक कथांकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन बदलेल

7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या चित्रपटासंदर्भातील एक मोठे अपडेट समोर आले आहे.

अलौकिक देसाई यांचा 'सीता - एक अवतार' हा आगामी चित्रपट ब-याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटासाठी अभिनेत्री करीना कपूरला पहिली पसंती दर्शवली गेली होती, पण तिने या चित्रपटासाठी तब्बल 12 कोटी रुपये मानधन म्हणून मागितले होते. शिवाय सीतेच्या भूमिकेत करीनाच्या नावाला विरोधही झाला होता. आता या चित्रपटासंदर्भातील एक मोठे अपडेट समोर आले आहे. या चित्रपटात करीना नव्हे तर आता अभिनेत्री कंगना रनोट मुख्य भूमिका वठवणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अलौकिक देसाई यांनी कंगनासोबतचा एक फोटो शेअर करत या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

हा चित्रपट पौराणिक कथांकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन बदलेल

पद्मश्री आणि 4 वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री कंगना रनोट या चित्रपटात सीतेची भूमिका साकारणार आहे. दिग्दर्शक निर्मात्यांनी नुकतीच कंगनाच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. अलौकिक यांनी लिहिले - सीता आरंभ, ब्रह्मांड त्या लोकांची मदत करतो जे विश्वासास समर्पण करतात. मृगजळ काय होते ते आता स्पष्ट झाले आहे. हा पवित्र प्रवास पौराणिक कथांकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन बदलेल.

निर्मात्या सलोनी शर्मा यांनी याची पुष्टी करताना सांगितले की, "सीता या चित्रपटात कंगना रनोटचे स्वागत करताना मला आनंद होतोय.'

दरम्यान या चित्रपटाचे लेखक केवी विजयेंद्र प्रसाद यांनी काही दिवसांपूर्वी चित्रपटात सीतेच्या भूमिकेसाठी कंगना रनोटचे नाव सुचवले होते. केवी प्रसाद हे दिग्दर्शक एसएस राजामौली यांचे वडील आहेत. त्यांनी बाहुबली सीरिज, बजरंगी भाईजान, मणिकर्णिका, औ थलायवी या चित्रपटांची स्क्रिप्ट लिहिली आहे. केवी प्रसाद आता सीता या चित्रपटाद्वारे परतत आहेत. हा चित्रपट हिंदीसह तामिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होईल.

बातम्या आणखी आहेत...