आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंगनाला काँग्रेसचा सल्ला:राम कदमांचे आभार मानणा-या कंगना रनोटला सचिन सावंत यांचा सल्ला, म्हणाले -  'ही व्यक्ती मुलींसाठी फार धोकादायक आहे'

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगनाने मुंबई पोलिसांबद्दल मांडलेल्या भूमिकेनंतर काँग्रेसने तिला एक सल्ला दिला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर सातत्याने आपले रोखठोक मत मांडणारी अभिनेत्री कंगना रनोट हिने अलीकडेच थेट मुंबई पोलिसांवर टीका करत नवीन वादाला तोंड फोडले होते. आपल्याला मुंबई पोलिसांचीच जास्त भीती वाटतेय, असे सांगून तिने मुंबई पोलिसांची सुरक्षा घेण्यास नकार दिला होता. भाजपचे आमदार राम कदम यांनी केलेल्या ट्विटवर तिने ही भूमिका घेतली होती. मात्र आता कंगनाच्या या भूमिकेवरून काँग्रेसने तिला एक सल्ला देत राम कदम यांच्यावर निशाणा साधला आहे.

भाजप नेते राम कदम यांनी सुशांत मृत्यू प्रकऱणी कंगनाला सुरक्षा द्यावी, अशी मागणी केली होती. 'अभिनेत्री कंगना रनोेट ड्रग्जशी संबंधित माफिया नेते-अभिनेत्यांची नावे सांगण्यास तयार असल्याचे स्वतः सांगत आहे. याचे स्वागत करत महाराष्ट्र सरकारने चार दिवसानंतरही कंगनाला सुरक्षा का दिली नाही? रियाचे वकील किंवा दलाल असल्याप्रमाणे महाविकास आघाडी सरकार कुणाला लपवण्याचा आणि वाचवण्याचा प्रयत्न करत आहे?” असे ट्विट राम कदम यांनी केले होते.

राम कदम यांच्या ट्विटला कंगनाने उत्तर दिले होते. “मला आता मुव्ही माफिया गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटतेय. हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी, पण मुंबई पोलिस नको', असे कंगना म्हणाली होती.

  • काँग्रेसचा कंगनाला सल्ला

कंगनाने मुंबई पोलिसांबद्दल मांडलेल्या भूमिकेनंतर काँग्रेसने तिला एक सल्ला दिला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करून तुम्ही राम कदम यांच्यापासून घाबरून राहायला हवे, असे म्हटले आहे. 'कंगनाजी खरंतर तुम्ही ज्या व्यक्तीचे आभार मानले आहेत, त्याच्यापासूनच घाबरून राहायला हवे. मुलींसाठी ती फार धोकादायक आहे', असे म्हणत सावंत यांनी राम कदम यांच्यावर निशाणा साधला आहे.

  • सुशांत प्रकरणात कंगनाला करायची आहे मदत

रिया चक्रवर्तीचे ड्रग्ज संदर्भातील चॅट समोर आल्यानंतर सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. व्हायरल झालेल्या या चॅटमध्ये रिया चक्रवर्ती ड्रग्ज डिलींग करत असल्याचा दावा केला जात आहे. त्यानंतर बॉलिवूड आणि ड्रग्जचा संबंध असल्याचे कंगनाने म्हटले होते. बॉलिवूडमधील पार्ट्यांत कोकेन हमखास वापरले जाते. त्यामुळे आपल्याला नार्कोटिक्स ब्युरोची मदत करायची आहे पण त्यासाठी संरक्षण हवे असल्याचे, कंगनाने एक व्हिडिओ ट्विट करत म्हटले होते.