आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Congress MLA Harish Chandra Meena Questions On Kangana Ranaut's Credentials, Actress Replies I Am The Best Person To Lead Among So Many Fools

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेसच्या आमदाराला कंगनाने फटकारले:हरीशचंद्र मीणा यांनी कंगना रनोटच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह केले उपस्थित, अभिनेत्री म्हणाली - मूर्खांना धडा शिकवण्यासाठी मी बेस्ट आहे

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगनाने काँग्रेसच्या आमदाराला दिले चोख प्रत्युत्तर

अभिनेत्री कंगना रनोट आपल्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असते. अलीकडेच कंगनाने रिहानाला 'मूर्ख' म्हटले होते. आता आपल्या नवीन स्टेटमेंटमध्ये कंगना म्हणाली की, सोशल मीडियावर इतक्या मूर्खांना धडा शिकवणारी ती सर्वोत्कृष्ट व्यक्ती आहे.

एवढेच नव्हे तर, तिने स्वत:ला महाराणी म्हटले आणि तिचा तिरस्कार करणा-यांना तिने तिच्यापुढे डोके टेकवायला सांगितले आहे. काँग्रेसचे आमदार हरीशचंद्र मीना यांच्या सोशल मीडिया पोस्टवर कंगनाने हे विधान केले आहे. हरीशचंद्र मीना यांनी कंगनाच्या शैक्षणिक आणि राजकीय पात्रतेवर प्रश्नचिन्ह उभे केले होते.

कंगनाने काँग्रेसच्या आमदाराला दिले चोख प्रत्युत्तर
माजी डीजीपी आणि आमदार हरीशचंद्र यांच्या पोस्टवर उत्तर देताना कंगनाने लिहिले की, "माझी क्षमता, हा हा. मी स्वत: ला एक सामान्य माणूस मानते. पण बर्‍याच मूर्खांमध्ये सोशल मीडियावर नेतृत्व करणारी मी सर्वोत्कृष्ट व्यक्ती आहे. त्यामुळे या राणीसमोर डोके टेकवा.”

हरीशचंद्र यांनी कंगनाच्या पात्रतेवर प्रश्न उपस्थित केले होते
हरीश चंद्र यांनी कंगनाला टॅग केले करत तिच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, "प्रत्येक विषयावर मत व्यक्त करणा-या कंगना रनोटच्या क्षमतेबद्दल मला जाणून घ्यायचे आहे. कंगनाची शैक्षणिक आणि राजकीय गुणवत्ता जाणून घ्यायला मला नक्की आवडेल," अशा आशयाची पोस्ट त्यांनी शेअर केली होती.

बातम्या आणखी आहेत...