आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Controversial Family: Siddhant Caught From Rave Party Twice, Shraddha Was Also Interrogated In Drug Case While Shakti Trapped In Sting Operation

कॉन्ट्रोव्हर्सी:रेव्ह पार्टीतून दोनदा पकडला गेला सिद्धांत, ड्रग्ज प्रकरणात श्रद्धाची झाली चौकशी, स्टिंग ऑपरेशनमध्ये अडकले वडील

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाचा कोणकोणत्या वादात अडकले वडील-मुलं -

अभिनेता सिद्धांत कपूरला रेव्ह पार्टीतून ताब्यात घेण्यात आले होते. बंगळुरूच्या एका क्लबमध्ये डीजे म्हणून पोहोचलेल्या सिद्धांतने अमली पदार्थांचे सेवनही केले असल्याचे नार्कोटिक टेस्टमध्ये सिद्ध झाले आहे. स्पष्टीकरणात सिद्धांतने म्हटले आहे की, त्याला न सांगता कोणीतरी त्याच्या ड्रिंकमध्ये अमली पदार्थ मिसळले होते. तूर्तास सिद्धांतला जामिनावर सोडण्यात आले आहे. सिद्धांतच्या कुटुंबातील सदस्य ड्रग्ज प्रकरणात अडकण्याची किंवा वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी शक्ती कपूर, श्रद्धा कपूर हे देखील वेगवेगळ्या कारणांमुळे वादात सापडले आहेत-

शक्ती कपूरवर करण्यात आले होते स्टिंग ऑपरेशन
2005 मध्ये एका टीव्ही चॅनलने शक्ती कपूरवर स्टिंग ऑपरेशन केले होते. त्यांचे स्टिंग ऑपरेशन चांगलेच व्हायरल झाले होते. व्हिडिओमध्ये शक्ती कपूर एका महिलेकडे शरीर सुखाची मागणी करताना दिसले होते. चित्रपटात काम हवे असेल तर त्या बदल्यात शारीरिक संबंध ठेवावे लागतील, असे शक्ती महिलेला सांगताना व्हिडिओत दिसले होते. कास्टिंग काउचमुळे शक्ती खूप वादात सापडले होते. स्टिंग ऑपरेशन दरम्यान शक्ती यांनी दिग्दर्शक सुभाष घई यांचे नावही घेतले होते, त्यामुळे अनेक दिग्दर्शकांनी त्यांना काम देण्यास नकार दिला होता.

श्रद्धा कपूरवर झाला होता फसवणुकीचा आरोप

हसीना पारकर या चित्रपटात श्रद्धा कपूरने दाऊद इब्राहिमची बहीण हसीनाची भूमिका साकारली होती. चित्रपटातील श्रद्धाच्या कपड्यांसाठी एका कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती, पण जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा ब्रँड श्रेय दिले गेले नाही आणि त्यांचे प्रमोशनलही करण्यात आले नाही. कपड्यांच्या कंपनीने श्रद्धा कपूर आणि निर्मात्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

ड्रग्ज प्रकरणी श्रद्धा कपूरची चौकशी झाली होती

श्रद्धा कपूरने सुशांत सिंग राजपूतसोबत 'छिछोरे' या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान श्रद्धा आणि सुशांत यांच्या लिंकअपच्या बातम्याही आल्या होत्या, मात्र त्या फक्त अफवा होत्या. सुशांतच्या मृत्यूनंतर जेव्हा या प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आला तेव्हा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने श्रद्धाचीही चौकशी केली होती. खरंतर श्रद्धा कपूर आणि सुशांतच्या टॅलेंट मॅनेजरचे चॅट समोर आले होते, ज्यामध्ये श्रद्धाने सुशांतच्या मॅनेजरकडे CBD ऑइलची मागणी केली होती. हे तेल एक प्रकारचे ड्रग्ज असते. एनसीबीने श्रद्धाची अनेक तास चौकशी केली होती. स्पष्टीकरणात असे म्हटले होते की, सीबीडी ऑइल कायदेशीर आहे.

श्रद्धा कपूरवर घालण्यात आली आहे बंदी
2014 मध्ये श्रद्धा कपूरवर मीडियाने बंदी घातली होती. श्रद्धा अनेक कार्यक्रमांना मुद्दाम चेहरा लपवत पोहोचायची, त्यामुळे तिचे कव्हरेज होऊ शकत नसायचे. एकदा विमानतळावर फोटो काढल्यानंतर श्रद्धा फोटोग्राफरवर चिडली होती. तिच्या अशा वागण्याने संतप्त झालेल्या संपूर्ण प्रसारमाध्यमांनी तिच्याशी संबंधित बातम्या आणि फोटो वापरण्यास नकार दिला होता.

रेव्ह पार्टीत पकडला गेला सिद्धांत कपूर
याआधीही 2013 मध्ये झालेल्या रेव्ह पार्टीत सिद्धांत कपूर पकडला गेला होता. सिद्धांत त्या पार्टीतही डीजे बनून पोहोचला होता. पार्टीत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ सापडले होते, मात्र नार्कोटिक टेस्टनंतर सिद्धांतला क्लीन चिट मिळाली होती.

शक्ती यांच्यावर बिग बॉसमध्ये लागला होता अश्लीलतेचा आरोप
शक्ती कपूर यांनी बिग बॉस या रिअ‍ॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. शोमध्ये त्यांच्यावर अफगाणिस्तानच्या विदा समदजईसोबत अश्लीलतेचा आरोप करण्यात आला होता. शक्ती यांनी विदाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता, ज्याचा व्हिडिओ देखील समोर आला होता.

बातम्या आणखी आहेत...