आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघड कोड्याप्रमाणे रिया चक्रवर्ती:इंजिनीअरिंग सोडून रिया चित्रपटांत आली, 8 वर्षात सलग 7 फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर मिळवली कोट्यावधींची संपत्ती

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 1 जुलै 1992 ला जन्मलेल्या रियाचे वडील बंगाली तर आई कोंकणी आहे
  • रिया गेल्या एक वर्षांपासून सुशांत सिंह राजपूतची लिव्ह इन पार्टनर होती

14 जून 2020 रोजी सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूची बातमी उघडकीस आल्यापासून सर्वत्र फक्त एकच नाव ऐकले गेले आहे आणि ते म्हणजे रिया चक्रवर्ती. रियाच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाबद्दल यापूर्वी जितकी चर्चा झाली नव्हती तेवढी चर्चा आता होत आहे.

गेल्या एका वर्षापासून रिया सुशांतची लिव्ह-इन पार्टनर होती. तिच्यावर सुशांतच्या कुटुंबीयांनी आपल्या मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. सीबीआय या आरोपांची चौकशी करत आहे पण सुशांतच्या संशयास्पद मृत्यूमधील रिया चक्रवर्ती हे सर्वात मोठे लक्ष्य आहे.

अशावेळी जाणून घेऊया रियाच्या आयुष्य आणि कामासंबंधीत खास गोष्टी -

हरियाणाच्या अंबाला येथे रियाचे बालपण गेलेय

रियाचा जन्म बेंगलुरूमध्ये झाला होता. १ जुलै, 1992 रोजी इंद्रजित चक्रवर्ती आणि संध्या चक्रवर्ती यांच्या घरी जन्मलेल्या रियाने अंबाला कँटच्या आर्मी पब्लिक स्कूलमधून आपले शिक्षण पूर्ण केले. रियाचे वडील बंगाली आणि आई कोंकणी आहेत. रियाचे वडील सैन्यात डॉक्टर आहेत तर आई गृहिणी आहे.

रियाला एक भाऊ आहे त्याचे नाव शोविक आहे. या चौघांवर सुशांतच्या कुटूंबाने आत्महत्या, गुन्हेगारी कट, चोरी, फसवणूक आणि धमकी दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे.

अभियांत्रिकी सोडून बनली अभिनेत्री

रियाने एमटीव्हीच्या रिअॅलिटी शो 'टीन दिवा'च्या माध्यमातून ग्लॅमरच्या जगतात पाऊल ठेवले. त्यामध्ये ती फर्स्ट रनर अप ठरली. त्यानंतर तिने दिल्लीतील एमटीव्हीची व्हिडिओ जॉकी होण्यासाठी ऑडिशन दिले आणि तिची निवड झाली.

रियाने व्हीजे असताना 'एमटीव्ही वास्सअप', 'कॉलेज बीट' आणि 'एमटीव्ही गॉन इन 60 सेकंड्स' होस्ट केले. दरम्यान, अभिनेत्री होण्याचे तिचे स्वप्न जागृत झाले. त्या काळात ती अभियांत्रिकी शिकत होती पण तिला अभियंता होण्यात काही रस नव्हता म्हणून तिने अभियांत्रिकी सोडली आणि अभिनयाकडे वळली.

चित्रपट कारकीर्द फ्लॉप ठरली

यशराज फिल्म्सच्या 2010 मध्ये आलेल्या 'बॅंड बाजा बारात'साठी रियाने ऑडिशन दिले होते पण मुख्य भूमिकेसाठी तिला नाकारले गेले होते. या चित्रपटात अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत आहे. रियाला तिचा पहिला ब्रेक 2012 मध्ये आलेली तेलगू फिल्म 'तुनेगा तुनेगा' च्या माध्यमातून मिळाला होता. या चित्रपटात तिने निधी नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट फ्लॉप ठरला पण त्यानंतर 2013 मध्ये लवकरच रियाला बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळवला. तिला फिल्म 'मेरे डॅडची मारुती' मध्ये जसलीनची भूमिका साकारण्याची संधी मिळाली पण हा चित्रपटही फ्लॉप ठरला.

तीन वर्षे बसून होती रिया

  • 2014 मध्ये रियाचा आलेला तिसरा चित्रपट सोनाली केबल हा देखील सुपरफ्लॉप ठरला. याचा परिणाम असा झाला की, तिला तीन वर्षे घरात बसून राहावे लागले.
  • 2017 मध्ये तिला 'हाफ गर्लफ्रेंड' आणि 'दोबारा: सी योर ईविल' सारख्या चित्रपटंमध्ये कॅमियो मिळाला मात्र हे चित्रपटही फ्लॉक ठरले. यानंतर 2017 मध्ये आलेल्या बँक चोर आणि 2018 मध्ये आलेल्या जलेबी मध्ये रियाला मुख्य अभिनेत्री म्हणून भूमिका साकारण्याची संधी मिळाली. मात्र यामध्ये ती अयशस्वी ठरली. यानंतर रिया कोणत्याच चित्रपटात दिसलेली नाही.
  • रियाने एकूण आयुष्यात 8 चित्रपटांमध्ये काम केले. पण तिचे फिल्मी करिअर यशस्वी होऊ शकले नाही. रिया आणि सुशांतसोबत रुमी जाफरी एक चित्रपट बनवण्याचे प्लानिंग करत होते. याची शूटिंग याच वर्षी मे महिन्यात सुरू होणार होती. मात्र लॉकडाऊनमुळे असे होऊ शकले नाही. आता सुशांत गेल्यानंतर हा चित्रपट कधीच बनू शकणार नाही.

10-15 लाख आहे वार्षिक उत्पन्न
28 वर्षांची रिया गेल्या दोन वर्षांच्या आयटीआरवर नजर टाकली तर तिचे वार्षिक उत्पन्न 10-15 लाख रुपयांच्या जवळपासर आहे. मात्र तिच्या जवळ मुंबईमध्ये कोट्यावधींची संपत्ती आहे. ही प्रॉपर्टी रियाने कशी बनवली या प्रकरणी ईडी तपास करत आहे. रियावर सुशांतच्या 15 कोटींची हेराफेरी केल्याचा आरोप आहे.

ब्रांड एंडोर्समेंटसाठी मिळतात केवळ 3 लाख ते 5 लाख रुपये

आम्ही बॉलिवूड ट्रेड एनालिस्टकडून रियाच्या प्रत्येक चित्रपटाची फीसची माहिती विचरण्याचा प्रयत्न केला. तर त्यांनी सांगितले की, 25-30 लाखांपेक्षा जास्त पैसे तिला दिले गेलेले नसतील. तर अॅड गुरूओनुसार ब्रांड एंडोर्समेंटसाठी रियाला 3 लाख ते 5 लाख रुपये मिळतात.

बातम्या आणखी आहेत...