आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Conversatation Between Riya And Sushant Singh Rajpoot Become Public| The Actor Is Seen Angry With His Sister; Accused Of Playing Victim Card.

सुशांत केसमध्ये रियाने सुरू केला बचाव:रियाने शेअर केले सुशांतसोबतच्या व्हॉट्सअप चॅटचे स्क्रीनशॉट, यामध्ये बहिणीवर रागावलेला दिसतोय अभिनेता

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेता सुशांत सिंह राजपूतने 14 जूनला आपल्या बांद्रा येथील फ्लॅटमध्ये फाशी घेऊन आत्महत्या केली होती
  • यानंतर सुशांतच्या वडिलांनी रिया आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाविरोधात गंभीर आरोप करत पाटण्यात केस दाखल केली होती

अभिनेता सुशांतसिंग राजपूत प्रकरणात सतत आरोपांचा सामना करणारी रिया चक्रवर्ती आता सतत वेगवेगळ्या मार्गांनी स्पष्टीकरण देत आहे. शनिवारी त्याच्या आणि सुशांत यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट तिच्या लीगल टीमने जाहीर केले. यामध्ये सुशांत त्याची बहीण प्रियंकाबद्दल बोलत आहे.

या चॅट्स पाहता असे दिसते की रिया आणि त्याच्या बहिणींचे संबंध चांगले होते. रियाने चॅट्स सार्वजनिक करण्यामागे तिची प्रतिमा योग्य दर्शविण्याचा प्रयत्न केला जात आहे. दुसरे म्हणजे, या चॅटमध्ये लिहिलेल्या गोष्टींवरून असे दिसते की सुशांत आणि त्याचे कुटुंबांत सर्व काही ठीक नव्हते.

सुशांत आणि रियाची चॅट

या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये दोघे प्रथम अगदी आरामात चर्चा करतात. सायंकाळी 6.8 ते संध्याकाळी 6.14 दरम्यान या दोघांमध्ये बातचित झाली. खरंतर तारीख, महिना आणि वर्ष यामध्ये स्पष्ट नाही. यानंतर सुशांत रियाला एकामागून एक तिच्या बहिणीबद्दल अनेक गोष्टी सांगतो. सुशांत प्रथम रियाला मेसेज करतो आणि त्यात लिहितो.

'तुझे कुटुंब अप्रतिम आहे. सर (रियाचे वडील) अगदी बरोबर आहेत. शोविक सहानुभूतीने परिपूर्ण आहे आणि तुही माझी आहे, या महत्त्वपूर्ण बदलांमागे तु एक पर्याप्त कारण आहे. तुमच्या सर्वांच्या सभोवताल असणे मला आनंददायक वाटेल. माझी मैत्रिण, माझी रॉकस्टार असल्याबद्दल चीअर्स. '

'कृपया हसत राहा, तु त्यात खूप छान दिसते. मी आता झोपायचा प्रयत्न करतो. माझी इच्छा आहे की मला जमीलासारखे एखादे स्वप्न पडेल. किती छान होईलना? टाटा '

सुशांतच्या मॅसेजला उत्तर देताना रिया लिहिते, "हाहा ... झोप घे माझ्या प्रिय मुला ... मी फ्लाइट लँड केल्यानंतर तुला कॉल करेन आणि आशा करतो की तू चंद्रावर उतरशील ... झोप स्वीट बाबा बॉय".

यानंतर रात्री आठच्या सुमारास रिया पुन्हा एकदा त्याची परिस्थिती जाणून घेण्यासाठी त्याला मेसेज करते. त्याला उत्तर म्हणून सुशांतचा मॅसेज येतो, 'चांगले नाहीये ... माझी बहीण आता विक्टिम कार्ड खेळून सिड भाईला मॅनिपुलेट करत आहे, कारण या संपूर्ण गोष्टींवरुन लक्ष विचलित करुन (मी आणि तु जी गोष्ट मागे सोडत आहोत तीच गोष्ट) माझ्यावर येईल की मी फिजिकली पनीशेंट त्यांना दिली. हे खूप निराशादायक आहे.'

त्यानंतर रिया सुशांतला मीटिंगनंतर बोलवायला सांगते. त्यानंतर सुशांत रियाला मेसेज करतो ज्यामध्ये त्याने प्रियंकासाठी लिहिले आहे. सुशांत त्यामध्ये लिहितो, 'तुम्ही करा हे, हा लज्जास्पद गोष्टीसाठी, दारुच्या नशेत छेडछाडीमध्ये तुम्ही व्हिक्टिम कार्डचा गेम खेळून त्याला कव्हरअप करण्याचा प्रयत्न करत आहे.'

तर माझ्या प्रिय भगिनी, तिच आपली आई आणि देव आहे, जिने मला शिकवले आणि तुम्ही या शिकवनीनुसार एक अपराध केला आहे. जर तुसा अहंकारामुळे काही दिसत नसेल तर देव तुझं भलं करतो. कारण मी घाबरत नाही आणि मी पुढेही ते काम करत राहिल जे आतापर्यंत करत आलो आहे. मी जीवनात अवश्य बदल आणत राहणार.'

कोण बरोबर आहे याचा निर्णय देव आणि प्रकृतीलाच करु दे. (हा मॅसेज कदाचित सुशांतने आपल्या बहिणीला पाठवला होता, जो त्याने रियाला दाखवला)

पुढचा मॅसेज जो सुशांतने सिडला लिहिला होता. यामध्ये सुशांतने लिहिले की, 'तिने तुला माझ्या डोळ्यांदेखत मारले आणि ते माझ्या बहिणीने केले. ज्याला लोक समजतात की, दारुच्या नशेत केले असेल आणि तु तिच्या व्हिक्टिम कार्डच्या गोष्टीं मान्य करत आहेस. प्लीज मला हे सांग की, तु आणि मी ऋषिकेश बसमध्ये काय केले होते. त्या गोष्टीला आपण बहिणीच्या नजरेने पाहिले तर आपण वारंवार लाजिरवाने होऊ'

मी महिलांचा सन्मान करतो आणि त्यांनी हे देखील शिकवले आहे की, नेहमी सत्याची साथ द्यावी आणि सत्य असेल तर घाबरु नका. तुला वाटते का की वाद करणारी माझी कोणतीही गोष्टी अडचण आहे आणि तिचे काम योग्य आहे. भाई मी सर्व नाते सोडून देईल आणि जगात पॉझिटिव्ह बदल आणण्यासाठी जे करत आहे, त्यामध्येच लढत राहिल. तु तेच कर जे तुला योग्य वाटते. मी समजून घेईल.

बातम्या आणखी आहेत...