आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनोरंजन:भारतात शूटिंगसाठी लोकेशनची शोधाशोध; 200 कोटी वाचणार

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • विदेशी लोकेशनची गरज असलेल्या चित्रपटांसाठी गोवा, काश्मीर, पूर्वाेत्तरला मागणी

(मनीषा भल्ला)

संजय दत्त, बोमन इराणी व अर्शद वारसीच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे युरोपात चित्रीकरण होणार होते. मात्र, आता निर्माते आनंद पंडित हे शूटिंग गोवा व कसौलीत करणार आहेत. ‘दोस्ताना - २’ आणि ‘तख्त’सारख्या चित्रपटांची परदेशातील शूटिंग रद्द झाली आहे. यामुळे निर्मात्यांचा मोठा खर्च वाचणार आहे. शूटिंगची परवानगी व इतर सुविधांसाठी काम करणारी कंपनी जस्टावर्ल्ड मीडियाचे एचओडी सलील काकडे म्हणाले, यूपी-बिहारमध्ये शूटिंगसाठी विचारणा वाढली आहे. विदेशी लोकेशनची गरज असलेल्या चित्रपटांसाठी गोवा, काश्मीर, पूर्वाेत्तरला मागणी आहे. तेथे कमी धोका असल्यामुळे परदेशातूनही विचारणा केली जात आहे.

जेसन बोर्न या हॉलीवूडपटाच्या गोव्यातील शूटिंगनंतर टीमने देशात इतर भागांचीही माहिती मागवली. चित्रीकरणावर वार्षिक २ हजार कोटी रुपये खर्च होतात. यातील १०% म्हणजेच सुमारे २०० कोटी रुपये विदेशात खर्च होतात. आता हा पैसा देशातच खर्च होईल. ते म्हणाले, नेटफ्लिक्स व अॅमेझॉन प्राइमचे प्रोजेक्ट्स अफगाणिस्तानात होत होते. आता कच्छमध्ये विचारणा होत आहे. काही विदेशी सिरीजचेही भारतात शूटिंग होईल. ग्लोबल फिल्म शूटचे सुधांशू हुक्कू म्हणाले, आमच्याकडे राजस्थान, उत्तराखंड, कच्छ, मध्य प्रदेशमधील लोकेशनसाठी विचारणा झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...