कोरोना लॉकडाऊन : गायिका श्वेता पंडितने इटलीहून सांगितली आपबीती, म्हणाली - मी महिनाभरापासून खोलीबाहेर गेले नाही, फक्त सायरनचा आवाज ऐकू येतो 

  • इटलीतील सद्यस्थिती सांगतानाचा एक व्हिडिओ श्वेता पंडितने शेअर केला आहे.

दिव्य मराठी वेब टीम

Mar 25,2020 05:53:00 PM IST

बॉलिवूड डेस्क. बॉलिवूड गायिका श्वेता पंडित तिच्या इटॅलियन वंशाचा नवरा इव्हानो फुच्चीसोबत इटलीत वास्तव्याला आहे. कोरोनाव्हायरसने इटलीमध्ये उद्रेक केला आहे येथे आतापर्यंत 8000 हून अधिक लोकांचा जीव गेला आहे. इटलीमध्ये व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत श्वेता पंडितसुद्धा आपल्या पतीसमवेत भारतात परतू शकली नाही आणि होम आयसोलेशनमध्ये आपला वेळ घालवत आहे. श्वेताने हा अनुभव तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. इटलीतील सद्यस्थिती सांगतानाचा एक व्हिडिओही तिने शेअर केला आहे.

View this post on Instagram

#staysafe #stayhome #prayforitaly #italylockdown #indialockdown #jantacurfew

A post shared by SP ✨ (@shwetapandit7) on Mar 24, 2020 at 2:16pm PDT

  • महिन्याभरापासून बाहेर गेले नाही

श्वेता व्हिडिओमध्ये म्हणाली, "मित्रांनो, मी स्वत: गेल्या एक महिन्यापासून माझ्या खोलीबाहेर गेले नाही, आणि इथल्या सरकारने लॉकडाऊन जाहीर न करण्यापूर्वीच हे केले. कारण जेव्हा आम्हाला कळले की येथे असा आजार पसरला आहे, जो आपल्याला कळतदेखील नाही की कधी झाला आणि कुणाला भेटल्याने झाला. एक साधा सर्दी, खोकला बस्स...

जेव्हा व्यक्ती आपल्या डॉक्टरांकडे जातो, रुग्णालयात जातो तोपर्यंत त्याला समजते की त्याला आयसीयूची आवश्यकता आहे, ऑक्सिजनची आवश्यकता आहे आणि काही दिवसांनी त्याचा मृत्यू होतो. कोरोनामुळे इटलीत अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे आणि बर्‍याच जणांचा मृत्यू झाला आहे. सकाळी इथे उठल्यावर फक्त सायरनचा आवाज ऐकू येतो. मी देवाच्या कृपेने व डॉक्टरांनी सुचवलेल्या सर्व खबरदारी घेतल्याने ठीक आहे. होळीच्या वेळी मी भारतात येण्याचा विचार करीत होते, पण तेथेही कोरोनाच्या वाढत्या घटनांमुळे कोणतीही रिस्क घेतली नाही. माझे पालक आणि कुटुंबातील इतर सदस्य भारतात आहेत आणि मला त्यांची खूप आठवण येते. 21 दिवसांचे लॉकडाऊन भारतात जाहीर केले गेले हे चांगले आहे.

  • बर्‍याच चित्रपटांसाठी केले पार्श्वगायन

श्वेता पंडितने 'मोहब्बतें', 'सज', 'दिल क्या करे', 'राजू चाचा', 'नई पडोसन', 'ज्युली', 'कभी अलविदा ना कहना', 'वेलकम बॅक' ,' यमला पगला दिवाना ', 'सत्याग्रह', 'हायवे' आणि 'गुड्डू की गन' यासह अनेक हिंदी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे. हिंदीशिवाय ती तामिळ, तेलगू आणि पंजाबी भाषेतही गाते. श्वेता अनिल कपूरच्या टीव्ही शो '24' मध्ये अभिनेत्रीच्या रुपात दिसली आहे. याशिवाय तिने बिजॉय नांबियारच्या ‘डेव्हिड’ चित्रपटातही काम केले आहे.

X