आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
‘बिग बॉस-13’ फेम अभिनेत्री आणि गायिका हिमांशी खुराणा कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. नुकतीच तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती सर्वांना दिली. 26 सप्टेंबर रोजी तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर ती होम क्वारंटाइन होती. मात्र बुधवारी अचानक तिची ऑक्सिजन पातळी कमी जास्त होऊ लागली, त्यामुळे तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हिमांशी खुराणाच्या निकटवर्तीने स्पॉटबॉयला सांगितल्यानुसार, हिमांशीचा कोरोना रिपोर्ट शनिवारी पॉझिटिव्ह आला होता. तेव्हापासून ती होम क्वारंटाइन होती. मात्र आज सकाळी अचानक तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. तिला 105 डिग्री ताप होता आणि तिची ऑक्सिजन लेव्हलही कमी जास्त होत होती.
श्वास घ्यायला त्रास होत असल्याने हिमांशीला सुरुवातीला चंदीगड येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र नंतर तिला रुग्णवाहिकेतून लुधियाना येथे शिफ्ट करण्यात आले आहे. सध्या ती डॉक्टरांच्या देखरेखीत असून तिच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
नुकतेच तिने पंजाबमधील शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनात भाग घेतला होता आणि आता तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे ही चर्चा आणि चिंतेची बाब झाली आहे. कारण हिमांशीमुळे त्या लोकांना जास्त धोका राहील जे तिच्या संपर्कात आले होते.
View this post on InstagramA post shared by Himanshi Khurana 👑 (@iamhimanshikhurana) on Sep 26, 2020 at 11:18pm PDT
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.