आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऑस्कर विजेते अभिनेता टॉम हँक्स आणि त्यांची पत्नी रीटा विल्सन हे कोरोना व्हायरसपासून पूर्णपणे बरे झाले आहेत. इतकेच नाही तर दोघांनी प्रकृती सुधारताच टीव्हीवर कमबॅकही केले आहे. टॉम यांनी बुधवारी कोरोनावर उपचार करण्यासाठी वापरला जाणारा प्लाझ्मा दान केला आहे. अभिनेत्याने इंस्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती दिली. त्यांनी आपल्या प्लाझ्माचा फोटोही शेअर केला आहे.
टॉम यांनी फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आणि लिहिले- 'गेल्या आठवड्यातील प्लाझ्मा बॅग, कागदपत्रांच्या सोपस्कारांनंतर हे झोप घेण्याइतकचे सोपे होते'. टॉम आणि रीटा यांचा कोरोना रिपोर्ट मार्चमध्ये पॉझिटिव्ह आला होता. एल्व्हिस प्रिस्लेच्या बायोपिकच्या शूटिंगसाठी टॉम ऑस्ट्रेलियात पोहोचले होते. या जोडप्याने सोशल मीडियावरच त्यांना कोरोना संसर्ग झाल्याची माहिती दिली होती. यानंतर, क्वारंटाईनमध्ये राहिलेले हे कपल आपल्या अधिकृत हँडल्सवर हेल्थ अपडेट देत राहिले. 1994 च्या ‘फॉरेस्ट गंप’ या चित्रपटात टॉम यांनी मुख्य भूमिका साकारली होती. टॉम यांच्या या चित्रपटाचा अभिनेता आमिर खान 'लाल सिंह चड्ढा' या नावाने हिंदी रिमेक बनवित आहे.
दोन्ही स्टार टीव्हीवर परतले
आजारामुळे ब्रेक घेतल्यानंतर टॉम यांनी प्रथमच टीव्ही शो होस्ट केला. त्यांनी त्यांचा गाजलेला सॅटर्ड नाईट लाइव्ह हा शो होस्ट केला. पण सध्या या साथीच्या रोगामुळे त्यांनी विना लाइव्ह प्रेक्षकांशिवाय या कार्यक्रमाचे चित्रीकरण पूर्ण आले. तर रीटा यांनी एका मुलाखतीदरम्यान आपले अनुभव सांगितले. रीटाच्या म्हणण्यानुसार, दोघांनाही कोरोनाची लागण कशी झाली, हे त्यांना अद्याप समजले नाही. आयसोलेशनमध्ये जाण्यापूर्वी या दाम्पत्याने पाच दिवस ऑस्ट्रेलियाच्या एका रुग्णालयात घालवले होते. सध्या दोघेही कोरोनातून बरे झाले आहेत आणि सार्वजनिकरित्या समोर येत आहेत.
प्लाझ्मा थरेपी म्हणजे काय?
कोविड 19 या आजारातून बरे झालेल्या रुग्णांच्या रक्तामध्ये कोविड 19 च्या विषाणूविरोधी अँटीबॉडीज म्हणजे एक प्रकारचे प्रोटिन तयार करते. हे प्रोटिन किंवा अँडीबॉडी कोरोनामुक्त झालेल्या रुणांच्या प्लाझ्मामार्फत जर एखाद्या कोविड 19 विषाणूचा संसर्ग झालेल्या गंभीर रुग्णास दिले, तर या अँटीबॉडी कोरोना व्हायरसला मारायला मदत करते आणि रुग्ण वाटतील असा अंदाज आहे. अशा प्लाझ्मा थेरपीचा वापर यापूर्वी सार्स आणि मेर्स या आजारांमध्ये केला गेला होता. पण सध्या कोविड 19 या आजारात याचा किती उपयोग होईल हे अजून सुद्ध झालेले नाही. त्यामुळे याचा वापर प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.