आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सलमानच्या स्टाफ मेंबर्सना कोरोना:सलमान खान आणि त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह, कार चालक आणि 2 कुक यांच्यावर उपचार सुरु

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सलमानच्या घरात काम करणा-या सदस्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर बॉम्बे सिटी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.

अभिनेता सलमान खानचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. गुरुवारीच त्याच्या कार चालकासह दोन कुकना कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आले होते. सध्या त्यांच्यावर मुंबईतील बॉम्बे सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. कालपर्यंत सलमान बिग बॉसच्या या आठवड्यातील वीकेंड का वॉरचे चित्रीकरण करु शकणार नाही, अशी शक्यता वर्तवली गेली होती. मात्र त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने तो ‘वीकेंड का वॉर’ मध्ये दिसणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सलमानच्या कुटुंबातील इतर सदस्यांचाही कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

सलमानच्या जवळच्या सूत्रांच्या मते, त्याच्या स्टाफ मेंबर्सना किरकोळ लक्षणे आहेत, परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांना बॉम्बे सिटी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. सलमान खान त्याच्या उपचारांचा संपूर्ण खर्च उचलत आहे. त्याचा ड्रायव्हर किंवा कुकशी थेट संपर्क नव्हता. गेल्या 7 दिवसात सलमानला कोणतीही लक्षणे दिसली नाहीत, म्हणून नियमानुसार तो बिग बॉस शोच्या शूटिंगमध्ये सहभागी होईल. बिग बॉसचे शूटिंग सध्या मुंबईतील फिल्मसिटी स्टुडिओत सुरू आहे.

शूटिंग सेटवर ड्रायव्हरला कोरोनाची लागण झाल्याची चर्चा
सलमानच्या ड्रायव्हरमध्ये सर्वप्रथम कोरोनाची लक्षणे आढळली. त्यानंतर सलमानने त्याच्या संपूर्ण स्टाफची चाचणी करुन घेतली ज्यात आणखी दोन लोकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सलमानच्या ड्रायव्हरला एखाद्या सेटवर कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सलमान सहसा ड्रायव्हरच्या शेजारील सीटवर बसतो
लॉकडाऊन झाल्यापासून सलमान त्याच्या पनवेलस्थित फार्महाऊसमध्ये वास्तव्याला होता. येथूनच तो बिग बॉसच्या शूटिंगला जात होता. सेटवरदेखील तो सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत होता. सलमान सामान्यत: ड्रायव्हरच्या शेजारी सीटवर बसलेला दिसतो.

घरी होणारी पार्टी होऊ शकते रद्द

कोविडचा धोका लक्षात घेता सलीम खान आणि सलमा खान यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त होणारी पार्टी देखील रद्द केली जाऊ शकते अशीही चर्चा आहे. गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या आपल्या 'राधे -योर मोस्ट वॉन्टेड भाई' चित्रपटाचे शूटिंग सलमान खानने पूर्ण केले आहे. या चित्रपटात अभिनेत्री दिशा पाटनी सलमानसोबत मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.

शेराने वृत्ताचे केले होते खंडन
सलमान खानचा बॉडीगार्ड शेराने सलमान आयसोलेशनमध्ये असल्याच्या वृत्ताचे खंडन केले होते. दिव्य मराठीसोबत झालेल्या खास संभाषणात शेरा म्हणाला होता, 'भाई फिल्म सिटीमध्ये बिग बॉस -14 चे शूटिंग करत आहे. ते आयसोलेशनमध्ये नाहीत. लवकरच, तो फिल्म सिटीमध्येच आयुष शर्माच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरुवात करणार आहे. भाईचा कार चालक अशोक अगदी ठीक आहे. कोणत्याही ड्रायव्हरला काहीही झाले नाही.'

बातम्या आणखी आहेत...