आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बॉलिवूडचे न्यू नॉर्मल:गरोदरपणामुळे बेबोला भेटणा-या प्रत्येकाची होणार कोरोना टेस्ट, 'लाल सिंग चड्ढा'च्या सेटवर करीना कपूरसाठी आमिरकडून खास व्यवस्था

मुंबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • करीना कपूर दुस-यांदा आई होणार आहे.

आमिर खान आणि करीना कपूर खान यांनी गेल्या बुधवारपासून मुंबईत आपल्या आगामी 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. चित्रपटाच्या शूटिंग सेटवरुन आता रंजक गोष्टी समोर येत आहेत. सर्वात मोठी गोष्ट ही की, ज्यांना सेटवर आमिर किंवा करीनाला भेटायचे असेल त्यांना सर्वप्रथम स्वतःची कोरोना चाचणी करणे बंधनकारक असेल. तरच त्यांना या दोघांना भेटता येईल. कारण करीना कपूर दुस-यांदा आई होणार आहे. त्यामुळे तिच्या सुरक्षेसाठी ही गोष्ट बंधनकारक करण्यात आले आहे.

  • करीनासाठी या खास सुविधा

करीनाच्या भागाचे शूटिंग लवकरात लवकर पूर्ण करण्याचा निर्माते प्रयत्न करीत आहेत. अद्याप करीनाचे बेबी बंप दिसत नाही, तरीही निर्माता तिच्यासाठी व्हीएफएक्सचा वापर करतील. करीनाचे अद्याप 25 दिवसांचे चित्रीकरण बाकी आहे. ती अनेक महिन्यांपासून तिच्या भूमिकेसाठी तयारी करत आहे. आमिर खाननेही करीना कपूरच्या सुरक्षेसाठी काही खास व्यवस्था केली आहे. ज्या अंतर्गत प्रत्येक क्रू मेंबर आणि करीनाच्या जवळच्या संपर्कात असलेल्या कलाकारांना कोरोना टेस्ट करणे बंधनकारक असेल.

  • आमिर वीकेंडला मीटिंग घेत आहे

या चित्रपटासंदर्भात माहिती देताना कोई-मोईने आपल्या रिपोर्टमध्ये लिहिले की, पुढील आठवड्याच्या नियोजनावर चर्चा करण्यासाठी आमिर खान प्रत्येक आठवड्याच्या शेवटी संपूर्ण कलाकार आणि क्रू मेंबर्स यांच्यासोबत एक मिटींग घेतो. सेटवर कोरोना इन्फेक्शनचा धोका कमी करण्यासाठी ते सर्व आवश्यक खबरदारी घेत आहेत. कोरोनाच्या काळात शूट पुन्हा कसे सुरू करावे यासाठी आमिर खान, करीना कपूर खान आणि लाल सिंग चड्ढाची संपूर्ण टीम काही स्टँडर्ट सेट करत आहे.

0