आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिषेक बच्चनला कोरोना:अभिषेकने ज्या स्टुडिओत डबिंग केले होते, त्याची मालकीण म्हणाली- 'स्टुडिओ अजूनही खुला आहे, इतर महत्त्वाच्या गोष्टी सांगू शकत नाही' 

मुंबई (अमित कर्ण)6 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
मोना शेट्टी, अभिषेक बच्चन - Divya Marathi
मोना शेट्टी, अभिषेक बच्चन
 • मोना शेट्टी यांनी इतर महत्त्वपूर्ण माहिती शेअर करण्यास स्पष्ट नकार दिला.

कोविड-19 ची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक यांना मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर असा दावा करण्यात आला होता की, अभिषेकने मुंबईतील ज्या स्टुडिओत (साऊंड अँड विजन) 'ब्रीद: इंटू द शॅडोज' या वेब सीरिजच्या दुस-या सीझनचे डबिंग केले होते, तो तात्पुरता बंद करण्यात आला आहे. मात्र, स्टुडिओच्या मालकीण मोना शेट्टी यांनी दैनिक भास्करसोबतच्या खास बातचीतमध्ये या वृत्ताचे खंडन केले आहे. परंतु यासोबतच त्यांनी इतर महत्त्वपूर्ण माहिती शेअर करण्यास स्पष्ट नकार दिला. मोना यांच्या संभाषणाचा काही भाग : -

 •  स्टुडिओ बंद करण्यात आला आहे का ?

मोना: नाही, पण हो आम्ही आम्ही बीएमसीच्या प्रोटोकॉलचे अनुसरण करीत आहोत. टेस्टिंगचे काम चालू आहे.

 • म्हणजेच ऑफिस अजूनही अजूनही कार्यरत आहे?

मोना: होय. नक्कीच.

 • अभिषेक ऑफिसमध्ये येत होता, म्हणून तो कोविड पॉझिटिव्ह झाला, असे म्हटले जात आहे?

मोना: दोष देणारे लोक कोण आहेत? मला माहित नाही कोण हे बोलत आहे? कोविड -19 चा कोणताही रुग्ण घ्या आणि व्हायरस कोठून आला याबद्दल डॉक्टरांना विचारा, हे कोणीही सांगू शकत नाही. जर कोणी लिहून हा दावा करत असेल, तर नक्कीच आपण आरोप करू शकता. अन्यथा केवळ कथा बनवल्या जात आहेत.

 •  ही  गोष्ट संपण्याची आवश्यकता आहे?

मोना: खरं तर गोष्ट सुरु करण्याचा किंवा संपवण्याचा मुद्दा नाही. ही समस्या जगभर सुरू आहे. व्हायरस कोठून येत आहे हे स्पष्ट नाही? म्हणून जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती येते तेव्हा त्यानुसार आपल्याला ती हाताळावी लागते. बीएमसी संपूर्ण प्रकरण हाताळत आहे. आम्ही त्यांना या कामात मदत करीत आहोत. उर्वरित ऑफिसमध्ये सर्व सावधगिरीचे उपाय आहेत. योग्य सॅनिटायझिंग नेहमीच होत असते.

 •  स्टुडिओमध्ये अभिषेक किती दिवस डब करत होता?

मोना: मी हा तपशील देऊ इच्छित नाही. याची गरज नाही. हा एक गोपनीय तपशील आहे आणि आम्हाला तो मीडियाला द्यायचा नाही.

 •  'ब्रीद 2' व्यतिरिक्त इतर कोणते प्रोजेक्ट येथे चालू आहेत किंवा पुढे असतील?

मोना: आम्ही त्याची माहिती शेअर करू शकत नाही. कारण प्रत्येक क्लायंटची स्वतःची गोपनियता असते. मी कोणत्याही क्लायंटबद्दल बोलू इच्छित नाही.

 • म्हणजेच  ऑफिस बंद करण्यासाठी तुम्हाला बीएमसी कडून कोणतेही मार्गदर्शक तत्त्व नाही?

मोना: होय. असे कोणतेही मार्गदर्शक तत्त्व नाही. ते पूर्ण स्टुडिओ सॅनिटाइज करुन गेले ेआहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कसे करावे?, आम्हाला विभागाला कोणती माहिती द्यावी लागेल?, कुणाकुणाची टेस्टिंग करावी लागेल? हे त्यांनी समजावून सांगितले आहे. आम्ही त्यांचा नॉर्मल प्रोटोकॉल फॉलो करत आहोत. 

Open Divya Marathi in...
 • Divya Marathi App
 • BrowserBrowser