आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सेलेब्सच्या घरी कोरोना:फरहान अख्तरच्या बंगल्याचा गार्डही कोरोना संक्रमित, अभिनेत्याच्या घरातील इतर सदस्यांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह 

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री रेखाच्या बंगल्याच्या रक्षकाला कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर, आता त्यांच्या शेजारी राहणारा अभिनेता फरहान अख्तरच्या बंगल्याचा गार्डही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त आहे. त्यानंतर त्याला क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे. त्याचवेळी फरहान आणि घरातील इतर सदस्यांचा कोरोना रिपोर्ट हा निगेटिव्ह आला आहे.  

फरानचा बंगला वांद्रेच्या बॅन्डस्टँड परिसरात रेखाच्या घराशेजारी आहे. गार्ड संक्रमित सापडल्यानंतर फरहानच्या बंगल्यालाही बीएमसीने (बृहन्मुंबई महानगरपालिका) कंटेनमेंट झोन घोषित केले आणि तेथील लोकांच्या येण्याजाण्यावर बंधण घातली. 

घराबाहेर लावले कंटेनमेंटचे बॅनर 
या बंगल्यात फरहान त्याची बहीण झोया आणि आई हनी इराणीसमवेत राहतो. काही इतर रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की फरहान आणि घरातील इतर सदस्यांचा कोविड-19 चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर त्याच्या घराबाहेर कंटेनमेंट झोनचे बॅनर अजूनही लावण्यात आलेले आहे. 

रेखा यांच्या बंगल्याच्या सुरक्षा रक्षकाला कोरोना
रेखा यांच्या बंगल्याच्या सुरक्षा रक्षकाला कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर त्यांच्यासह, त्यांची मॅनेजर फरजाना आणि घरातील इतर चार कर्मचा्यांची कोरोना टेस्ट केली जाणार होती, पण बीएमसीची टीम जेव्हा तेथे पोहोचली तेव्हा कोणीही दार उघडले नाही.

मॅनेजर म्हणाल्या  - रेखा अगदी फिट आहेत
बीएमसीच्या पश्चिम वॉर्डचे मुख्य वैद्यकीय अधिकारी संजय फुडे यांनी जेव्हा फरजाना यांना फोन केला, तेव्हा त्यांनी सांगितले की रेखा अगदी फिट आहेत आणि त्यांची प्रकृतीदेखील उत्तम आहे. त्या स्वतःची कामे उत्तम प्रकारे करीत आहे. फरजाना यांनी सांगितले की, याकाळात रेखा कोणाशीही संपर्कात आल्या नाहीत, म्हणून त्या चाचणी करु इच्छित नाहीत, अशी माहिती फरजाना यांनी संजय फुडे यांना दिली.

सॅनिटाइज करण्यासाठीही दार उघडले नाही
त्यानंतर बीएमसीने रेखा यांचे घर सॅनिटाइज करण्यासाठी एक नवीन टीम पाठवली. त्यांनी घराच्या आत जाण्याचा प्रयत्न केला, परंतु यावेळीही कोणीही दरवाजा उघडला नाही. त्यानंतर सुरक्षा रक्षकाच्या केबिनसह घराच्या बाहेरील आणि त्याच्या अवतीभोवतीचा भाग सॅनिटाइज करुन ही टीम परत आली.