आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Coronavirus: Before Getting Infected, Akshay Kumar Did The First Scene Shoot Of 'Ram Setu' With More Than 50 Foreign Actors, Now Film Stopped Shooting For Few Days

रामसेतू:कोरोनाची लागण होण्यापूर्वी अक्षय कुमारने 50 हून अधिक विदेशी कलाकारांसोबत चित्रीत केले होते 'रामसेतू'चे पहिले दृश्य

अमित कर्णएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आता काही दिवसांसाठी चित्रीकरण थांबवण्यात आले

कोरोना काळात 'बेलबॉटम', 'अतरंगी रे' आणि 'बच्चन पांडे' या तीन चित्रपटांचे चित्रीकरण करणा-या अक्षय कुमारला त्याचा चौथा चित्रपट 'रामसेतू'च्या चित्रीकरणादरम्यान कोरोना झाला आहे. अक्षयला सोमवारी पवईस्थित हीरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सेटवर अक्षयशिवाय तब्बल 45 ज्युनिअर आर्टिस्टना कोरोना झाल्याची बातमी आहे.

अभिनेत्री नुसरत भरुचा आणि जॅकलिन फर्नांडिस बाबतच्या बातम्या पसरुनही त्यावर अधिकृतरित्या काहीही सांगण्यात आलेले नाही. दोघींनीही स्वतःला क्वारंटाइन केल्याचे समजते. खरं तर, सोमवारी चित्रपटाची टीम मड आयलँडमध्ये चित्रीकरण करणार होती. मात्र सुरुवातीला अक्षय कुमार कोविड पॉझिटिव्ह आला. त्यानंतर चित्रपटाशी जोडल्या गेलेल्या जवळपास 75 जणांची चाचणी करण्यात आली. त्यातील 45 जण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यानंतर चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे.

  • एका सीनमध्ये 50 कलाकार

सेटवर अक्षयच्या टीमसोबत जोडलेल्या एकाने सांगितले, 'अक्षयला कोरोना कुठे झाला, याची चौकशी केल्यानंतरच कळेल. चित्रपटाच्या पहिल्या सीनच्या चित्रीकरणासाठी 50 पेक्षा जास्त परदेशी कलाकार उपस्थित होते. यातले जास्तीत जास्त रशियन कलाकार आहेत. तर काही अफगानिस्तान आणि काही लंडन, न्यूयॉर्क येथील कलाकार आहेत. या सगळ्यांची चित्रपटात पत्रकाराची भूमिका होती. अफगानिस्तानहून आलेल्या कलाकारांना पाकिस्तानी पत्रकारांची भूमिका देण्यात आली होती.'

  • आता काही दिवसांसाठी चित्रीकरण थांबवण्यात आले

सूत्राने पुढे सांगितले, 'या कलाकारांसोबत पत्रकार परिषदेच्या सीनचे चित्रीकरण करण्यात आले. त्या पत्रकार परिषदेची सुरुवात अक्षयच्या पात्राने केली. तो जगभरातील पत्रकारांना 'रामसेतू' मिशनबाबात माहिती देत असतो. आर्किओलॉजिस्ट म्हणून अक्षय सर्व माहिती पत्रकारांना देत असतो. या दृश्याचे चित्रीकरण चार तास चालले. यात काही रिटेक झाले तर विविध कॅमेरा अँगलने हे दृश्य चित्रीत झाले. या दृश्याच्या चित्रीकरणानंतर पॅकअप झाले होते. त्यानंतर दुस-या दिवशी ही संपूर्ण टीम मड आयलँड येथे चित्रीकरण करणार होती. मात्र त्यापूर्वीच अक्षय आणि सेटवरील 45 ज्युनिअर आर्टिस्टना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आले. सध्या पुढील काही दिवसांसाठी चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे.'

  • 'सूर्यवंशी' प्रदर्शित होणे पुन्हा टळले

महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाउनसाठी परिस्थिती आहे. त्यामुळे मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन थिएटर बंद असतील. त्यातही चित्रपट आणि टीव्ही मालिकांच्या चित्रीकरणासाठी परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयानंतर दिग्दर्शक रोहित शेट्टीने आपला आगामी चित्रपट 'सूर्यवंशी'चे प्रदर्शन टाळले आहे. हा चित्रपट 30 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता.

बातम्या आणखी आहेत...