आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदत:'गेंदा फूल' गाणे लिहिणारे पश्चिम बंगालचे गीतकार रतन कहार यांना रॅपर बादशाहने दिले 5 लाख रुपये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रतन कहार सध्या हलाखीच्या परिस्थितीत दिवस घालवत आहेत.

रॅपर बादशाहने पुन्हा एकदा आपल्या नावाचे सार्थक केले आहे. 'बोरो लोकर बिटी लो' हे लिहिणारे गीतकार आणि लोक कलाकार रतन कहार यांच्या खात्यात बादशाहने पाच लाख रुपये जमा केले आहेत. शुक्रवारी बीरभूम येथे वास्तव्याला असलेल्या रतन कहार यांनी व्हिडिओ कॉलद्वारे बादशाहसोबत संपर्क साधला होता. यानंतर बादशाहच्या टीमने रतन त्यांच्या बँकेची माहिती व इतर आवश्यक माहिती घेतली आणि 6 एप्रिल रोजी हे पैसे त्यांच्या खात्यात जमा केले.

रिपोर्ट्सनुसार, रतन यांनी पैसे मिळाल्यानंतर पुन्हा बादशाहचे आभार मानले. एवढेच नव्हे तर रतन यांनी त्याला बीरभूम येथील सिउरी येथे त्यांच्या घरी येण्याचे आमंत्रणही दिले. यापूर्वी रतन यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते, 'मला बादशाहला भेटायचे आहे. त्यांनी माझे गाणे वापरल्याबद्दल मी त्यांचे आभार मानू इच्छितो, जर त्यांच्याकडे वेळ असेल तर, मी त्यांच्याबरोबर गाण्यांवर चर्चा करू इच्छितो.'

रतन कहार सध्या हलाखीच्या परिस्थितीत दिवस घालवत आहेत. म्हणून त्यांनी बादशाहकडे मदतीसाठी आवाहन केले होते. 'गेंदाफूल' या गाण्यासाठी रतन कहार यांना श्रेय न दिल्याबद्दल बादशाहला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. त्यानंतर त्याने एक लांबलचक पोस्ट लिहिली होती की, जेवढी शक्य होईल तेवढी तो रतन यांना मदत करण्यास तयार आहे.

बातम्या आणखी आहेत...