कोरोनाव्हायरस / 21 दिवसांच्या लॉकडाऊनवर ट्रोलर्सनी ऋषी कपूर यांची उडवली खिल्ली,  विचारले - ‘दारु का कोटा फुल है ना’

  • अभिनेते ऋषी कपूर यांना एका यूजरने विचारलेल्या प्रश्नाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

दिव्य मराठी वेब टीम

Mar 26,2020 01:58:01 PM IST


बॉलिवूड डेस्क. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले आणि लोकांना घरी राहण्याचे आवाहन केले. त्यांच्या या निर्णयाला ऋषी कपूर यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलेब्सनी पाठिंबा दिला आहे. अशातच अभिनेते ऋषी कपूर यांना एका यूजरने विचारलेल्या प्रश्नाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.


अलीकडेच ऋषी यांनी ट्विटरवर लिहिले होते- एकासाठी सर्व, सर्वांसाठी एक. चला आपण सर्वांनी जे काही शक्य आहे ते करूया. काळजी करण्यासारखे काही नाही, घाबरू नका. पंतप्रधानजी काळजी करू नका,आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर आहोत. जय हिंद! ऋषी कपूर यांचा हा सकारात्मक संदेश काही ट्रोलर्सना भावला नाही आणि त्यांनी त्यांच्या जीवनशैलीमुळे ऋषी यांना ट्रोल केले.


ट्रोलर्सनी विचारले, घरात दारूचा साठा आहे ना?
ट्विटरवर ट्रोलर्सनी ऋषी कपूर यांच्या मद्यपानाच्या सवयीची थट्टा केली. एका यूजरने, ‘दारु का कोटा फुल है ना चिंटू चाचा’ असा प्रश्न विचारला. तर आणखी एक यूजर त्यांना म्हणाला, चिंटूभाई फुल स्टॉक रखा है?. इतकेच नाही तर आणखी एका यूजरने त्यांना विचारले, सर व्हिस्की स्टॉक कर लिया क्या?

ऋषी कपूर यांनी सुनावले


ट्रोलर्सच्या या कृत्यावर ऋषीही गप्प बसले नाहीत आणि त्यांनी प्रत्येकाला चोख प्रत्युत्तरही दिले. ऋषी कपूर यांनी ‘ये एक और इडियट’ असे म्हणत सुनावले आहे.

इतकेच नाही तर त्यांनी लिहिले, कोणीही माझ्या देशाबद्दल आणि माझ्या जीवनशैलीची चेष्टा करेल, तर मी त्यांना डिलीट करेल. सावधगिरी बाळगा आणि सावध राहा. ही एक गंभीर समस्या आहे, ही परिस्थिती टाळण्यास प्रत्येकास

X