आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'गांधी'च्या कॉश्च्युम डिझायनर पडद्याआड:देशासाठी पहिला ऑस्कर जिंकणा-या कॉश्च्युम डिझायनर भानु अथैया यांचे निधन, वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुरुवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

1982 मध्ये दिग्दर्शक रिचर्ड एटनबरो यांच्या ‘गांधी’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट कॉश्च्युम डिझायनरचा ऑस्कर पुरस्कार जिंकणार्‍या भानु अथैया यांचे गुरुवारी निधन झाले. त्या 91 वर्षांच्या होत्या. भानु यांनी कॉश्च्युम डिझायनर म्हणून 100 हून अधिक बॉलिवूड चित्रपटांसाठी काम केले होते. भानु यांच्या पार्थिवावर दक्षिण मुंबईतील चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

8 वर्षांपूर्वी झाला होता ट्यूमर

गुरुवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे भानु यांच्या मुलीने सांगितले. 8 वर्षांपूर्वी त्यांना ब्रेन ट्यूमरचे निदान झाले होते. गेली 3 वर्षे त्या अंथरुणाला खिळून होत्या. भानु यांना अर्धांगवायू झाला होता.

भानु अथैया यांचा परिचय

भानु अथैया यांचे मुळ नाव भानुमती. त्यांचा जन्म 28 एप्रिल 1926 रोजी कोल्हापूरमध्ये झाला. कोल्हापुरातील गुजरी परिसरातील राजोपाध्ये रोड वर त्यांचे आजही जुने घर आहे. यांच्या आईचे नाव शांताबाई तर वडिलांचे नाव आण्णासाहेब होते. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांनी चित्रकलेशी दोस्ती केली तर त्याच दरम्यान त्यांनी एकादशी महात्म्य या सिनेमात बालकलाकार म्हणून देखील काम केले होते. त्या नऊ वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांची चित्रकलेची आवड पाहून त्यांच्या आईने त्यांना चित्रकलेचे शिक्षण दिले. शालेय शिक्षण संपल्यानंतर त्यांनी मुंबईचा जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. जे.जे स्कूल ऑफ आर्टच्या कॉलेजमध्ये चित्रकलेच्या शेवटच्या वर्षी त्याने सुवर्णपदक देखील मिळाले होते.

भानू अथय्या या ऑस्कर मिळवणाऱ्या त्या पहिल्याच भारतीय वेशभूषाकार होत्या.1960च्या दशकात भानू यांची रेखाटने पाहून अभिनेत्री नर्गिस प्रभावित झाल्या . नर्गिस यांच्यामुळेच भानू यांना राज कपूरच्या श्री 420 या सिनेमाच्या वेशभूषेचे काम मिळाले आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. गुरुदत्त यांचा साहिब बीबी और गुलाम, देव आनंद यांचा गाईड , आम्रपाली, शम्मी कपूर यांचा ब्रह्मचारी , ओम शांती ओम या हिंदी सिनेमातील वेशभूषेचे काम करता करता त्याना गांधी या सिनेमासाठी काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटातील गांधीजींच्या वेशभूषेसाठी भानु अथैया यांना ऑस्कर पारितोषिक मिळाले जोम मोलो यांच्यासोबत विभागून हे पारितोषिक असले तरी हे पारितोषिक मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय होत्या.

यासोबतच लगान, स्वदेस यासारख्या सिनेमातील कलाकाराच्या वेशभूषा त्यांनी समर्थपणे साकारलेल्या आहेत. अमोल पालेकर यांच्या महर्षी कर्वे या मराठी सिनेमासाठी त्यांनी वेशभूषा केली होती. दक्षिणात्य वेशभूषाकार सत्येंद्र यांच्याशी त्यांचा विवाह झाला असून काही वर्षांपूर्वी सत्येंद्र यांचे निधन झाले असून त्यांना एक मुलगी आहे.

बातम्या आणखी आहेत...