आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबईच्या महानगर दंडाधिकारी न्यायालयाने जावेद अख्तर यांनी कंगना रनोट हिच्याविरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यासंदर्भात चौकशीचे आदेश पोलिसांना दिले आहेत. शनिवारी जावेद अख्तर यांच्या वकिलांनी कोर्टात आपली बाजू मांडली आणि त्याची दखल घेण्याची विनंती केली. सुनावणीनंतर कोर्टाने जुहू पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्याचे आणि 16 जानेवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. कोर्टाचा हा आदेश क्रिमिनल प्रोसिजर कोड सेक्शन 202 अंतर्गत आला आहे.
2 नोव्हेंबर रोजी तक्रार दाखल केली होती
कंगनाने मुलाखतीत काय म्हटले होते?
कंगनाने एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून बॉलिवूडवर गंभीर आरोप केले होते. घराणेशाहीमुळे बॉलिवूडची वाट लागली आहे. बॉलिवूडमध्ये माफियाराज पसरले आहे, असा आरोप कंगनाने केला होता. त्यात दिग्दर्शक महेश भट आणि जावेद अख्तर यांच्यावरही तिने गंभीर आरोप केले होते. हृतिक रोशन आणि कंगना रनोट यांच्यात मोठा वाद भडकला होता. या प्रकरणात बोलू नये म्हणून अख्तर यांनी माझ्यावर दबाव टाकला. मला हृतिक आणि त्याच्या कुटुंबीयांची माफी मागायला सांगितले. तसे केले नाही तर तुला ते जेलमध्ये टाकतील, अशी दमदाटी अख्तर यांनी केल्याचे कंगनाने मुलाखतीत जाहीरपणे सांगितले होते.
कंगनाची बहीण रंगोली हिनेसुद्धा सोशल मीडियावर असेच आरोप केले होते. त्यामुळेच अख्तर यांनी कायदेशीर पाऊल उचलले आहे. रंगोलीने सोशल मीडियावर दावा केला होता की, "जावेद अख्तर यांनी कंगनाला घरी बोलावले आणि हृतिक रोशनची माफी मागण्याची धमकी दिली. महेश भट्टच्या चित्रपटात सुसाइड बॉम्बरची भूमिका साकारण्यास नकार दिल्याने महेश भट्ट यांनी कंगनावर चप्पल फेकली होती. ते पंतप्रधानांना फॅसिस्ट म्हणतात .... चाचाजी तुम्ही दोघे काय आहात?", अशा आशयाचे ट्विट करुन रंगोलीने जावेद अख्तर आणि महेश भट्ट यांच्यावर निशाणा साधला होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.