आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेजाऱ्यावर नाराज आहे भाईजान:सलमान खानने पनवेल फार्महाऊसच्या शेजाऱ्याविरोधात दाखल केला मानहानीचा खटला, कोर्टाने अभिनेत्याची याचिका फेटाळली

2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 जानेवारीला

अभिनेता सलमान खान अनेकदा कामातून ब्रेक घेतो आणि मुंबईतील पनवेल येथील त्याच्या फार्महाऊसवर वेळ घालवतो. ज्याचे फोटो आणि व्हिडिओ तो अनेकदा सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असतो. अलीकडेच सलमान खानने त्याच्या फार्महाऊसच्या शेजाऱ्यावर मानहानीचा खटला दाखल केला आहे. ज्यावर आता मुंबई शहर दिवाणी न्यायालयाने शुक्रवारी सलमान खानच्या बाजूने कोणताही अंतरिम प्रतिबंधात्मक आदेश देण्यास नकार दिला आहे.

या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 जानेवारीला
सलमान खानचा आरोप आहे की, एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत पनवेलमधील त्याच्या फार्महाऊसजवळील जमिनीचा मालक केतन कक्कर याने आपली बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता. न्यायाधीश अनिल एच लद्दाद यांनी केतन कक्करला सलमान खानने दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यावर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले असून न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 जानेवारी निश्चित केली आहे.

सलमानने केतन कक्करवर अपशब्दांचा वापर केल्याचा आरोप केला होता
सलमान खानने दाखल केलेल्या याचिकेनुसार, केतन कक्करने एका यूट्यूबरला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याविरुद्ध अपशब्दांचा वापर केला होता. शोमध्ये सहभागी झालेल्या इतर दोन लोकांची देखील प्रतिवादी म्हणून नावं देण्यात आली आहेत. या प्रकरणात यूट्यूबशिवाय सलमानने फेसबुक, ट्विटर आणि गुगलसारख्या सोशल मीडिया साइट्सचीही नावे आपल्या केसमध्ये समाविष्ट केली आहेत. हा अपमानास्पद मजकूर ब्लॉक करून प्रत्येक वेबसाइटवरून काढून टाकण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी सलमानने केली आहे.

सलमान खानच्या वकिलांनी खटला सुरू असताना केतन कक्करने या प्रकरणाबाबत कोणतेही विधान करू नये, अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे. मात्र, केतनचे वकील आदित्य प्रताप आणि आभा सिंह यांनी या मागणीला विरोध केला आहे. केतनच्या वकिलांनी सांगितले की, या खटल्याची कागदपत्रे गुरुवारी संध्याकाळीच त्यांना मिळाली आहेत.

वकील आभा सिंह यांनीही म्हटले आहे की, सलमान खानने खटला दाखल करण्यासाठी महिनाभर वाट पाहिली, तर केतनला उत्तर दाखल करण्यासाठी थोडा वेळ मिळायला हवा. त्यानंतर न्यायाधीश अनिल एच लद्दाद यांनी सुनावणी तहकूब केली.

सलमान कायम कुटुंबासोबत फार्महाऊसवर जात असतो
सलमान खान त्याच्या संपूर्ण कुटुंबासह मुंबईतील वांद्रे येथे राहतो. पण, कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी तो अनेकदा त्याच्या पनवेल येथील फार्महाऊसवर जातो. त्याचा शेजारी केतन कक्कर हा देखील मुंबईचा असून सलमान खानच्या फार्महाऊसजवळ टेकडीवर त्याचा प्लॉट आहे.

बातम्या आणखी आहेत...