आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोनामुळे यंदा देशभरात लॉकडाऊन होते. त्यामुळे अनेक चित्रपटांचे शूटिंग अर्ध्यावरच थांबवण्यात आले होते. अनलॉक झाल्यानंतर काही चित्रपटांचे शूटिंग पूर्ण झाले, मात्र चित्रपटगृहे बंद असल्याने चित्रपट प्रदर्शित होऊ शकले नाहीत. काही चित्रपटांच्या रिलीजसाठी ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर केला गेला आहे तर काही चित्रपट अजूनही थिएटरमध्ये प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहेत-
लाल सिंग चड्ढा
आमिर खान आणि करीना कपूर यांचा आगामी चित्रपट लालसिंग चड्ढा यावर्षी ख्रिसमसवर रिलीज होणार होता. चित्रपटाचे चित्रीकरण चंदीगडमध्ये सुरु होते, मात्र लॉकडाऊनमुळे शूटिंग थांबवण्यात आले होते. लॉकडाऊन उघडल्यानंतर आमिरने काही भाग शूट केले आहेत. मात्र अद्याप चित्रीकरण पूर्ण झालेले नाही. चित्रपटाचे शूटिंग परदेशातही होणार होते, परंतु हे आता शक्य नाही. आता हा चित्रपट पुढच्या वर्षी 2021 मध्ये प्रदर्शित होईल. अद्वैत चंदन दिग्दर्शित या चित्रपटाचे बजेट 105 कोटींच्या घरात आहे.
राधे
यंदा ईदच्या मुहूर्तावर सलमान खानचा राधे हा चित्रपट प्रदर्शित होणार होता, मात्र तसे होऊ शकले नाही. या चित्रपटाचे शूटिंग आता पूर्ण झाले आहे, मात्र निर्माते ओटीटीवर हा चित्रपट रिलीज करण्यास तयार नाहीत. चित्रपटाला बर्याच मोठ्या प्लॅटफॉर्मवरुन ऑफर्स येत आहेत पण निर्माते थिएटर उघडण्याची वाट बघत आहेत. या चित्रपटात सलमानसह दिशा पाटनी, जॅकी श्रॉफ आणि रणदीप हूडा यांच्या भूमिका आहेत.
सूर्यवंशी
रोहित शेट्टी दिग्दर्शित कोप युनिव्हर्सचा आगामी चित्रपट सूर्यवंशी यंदा 24 मार्चला प्रदर्शित होणार होता, मात्र त्यापूर्वीच लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. आता निर्माते चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी थिएटरची वाट पाहत आहेत. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार डीसीपी वीर सूर्यवंशीच्या भूमिकेत आहे, तर कतरिना कैफ त्याच्यासोबत दिसणार आहे. पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल.
संदीप और पिंकी फरार
अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा स्टारर संदीप और पिंकी फरार यावर्षी 20 मार्चला रिलीज होणार होता. चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणीही रिलीज करण्यात आली होती, शिवाय स्टारकास्ट चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होती, मात्र लॉकडाऊनमुळे चित्रपट पुढे ढकलण्यात आला. निर्माते सध्या थिएटरमध्ये चित्रपट रिलीज करण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
जर्सी
साऊथ फिल्म जर्सीच्या हिंदी रिमेकमध्ये शाहिद कपूर मुख्य भूमिकेत आहे. 28 ऑगस्ट 2020 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता, मात्र कोरोनामुळे हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला लॉकडाऊनची घोषणा झाली तेव्हा चित्रपटाचे चित्रीकरण चंदीगडमध्ये सुरु होते. संपूर्ण टीमला अचानक शूटिंग थांबवावी लागली. अनलॉक झाल्यानंतर शूटिंगला पुन्हा सुरुवात झाली आणि चित्रपटाचे शूटिंग 14 डिसेंबर रोजी पूर्ण झाले.
थलायवी
यावर्षी 26 जून रोजी कंगना रनोटचा चित्रपट 'थलायवी' सिनेमागृहात येणार होता, मात्र चित्रपटगृहे बंद झाल्यामुळे हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला होता. या चित्रपटात कंगना तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललितांच्या भूमिकेत दिसणार आहे. अलीकडेच कंगनाने चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्याचे सांगितले होते.
Sponsored By
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.