आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडचणीत अभिनेत्री:उर्मिला मातोंडकरांवर कोरोना निर्बंधांचे उल्लंघन केल्याचा आरोप, जिल्हा प्रशासनाचे चौकशीचे आदेश

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घ्या कुठली आहे ही घटना

बॉलिवूड अभिनेत्री आणि शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. त्या उपस्थित असलेल्या एका कार्यक्रमात कोरोनाच्या निर्बंधांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना झारखंडमधील पलामू जिल्ह्यातील आहे.

येथे एका हॉटेलच्या उद्धाटनाच्या कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी नियमांचे पालन करण्यात आला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

मेदिनीनगर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात कोरोनासंबंधी निर्बंधांचे उल्लंघन झाल्याची तक्रार स्थानिकांनी प्रशासनाकडे केली अशी माहिती उपायुक्त शशी रंजन यांनी दिली आहे. जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाचा तपास करणार असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे. दुसरीकडे हॉटेल प्रशासनाने मात्र आरोप फेटाळले असून नियमांचे पालन झाल्याचा दावा केला आहे.

उर्मिला मातोंडकर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या अशी माहिती हॉटेल प्रशासनाने दिली आहे. कोरोनामुळे आपण या कार्यक्रमासाठी दोन तासांऐवजी एक तासच उपस्थित राहू असे उर्मिला मातोंडकर यांनी कळवले होते असंही त्यांनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...