आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाच्या विळख्यात अडकल्या मैत्रिणी:अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा यांना कोरोनाची लागण; अनेक पार्ट्यांमध्ये झाल्या होत्या सहभागी, सुपर स्प्रेडर बनण्याची भीती

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या दोघींनी कोविड नियमांचे उल्लंघन केले असल्याची माहिती आहे.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. करीना आणि अमृता या दोघी जीवलग मैत्रिणी असून पार्टी गर्ल्स म्हणून त्यांना ओळखले जाते. या दोघीही कोरोनाच्या सुपर स्प्रेडर असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कारण या दोघींनीही गेल्या काही दिवसांत अनेक पार्ट्यांना हजेरी लावली होती. मात्र मुंबईतील पार्ट्यांमध्ये सहभागी होत असताना या दोघींनी कोविड नियमांचे उल्लंघन केले असल्याची माहिती आहे.

महानगरपालिकेने करीना आणि अमृताच्या संपर्कात आलेल्या लोकांना RTPCT चाचणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांच्या संपर्कातील आणखी काही सेलिब्रिटींचे अहवाल आज येऊ शकतात. दोघींच्याही प्रकृतीविषयीचे अपडेट अद्याप समोर आलेले नाहीत.

करीनाच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचे म्हणजे, तिची महत्त्वाची भूमिका असलेला ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. यात ती आमिर खानसोबत दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...