आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाचा विळखा:'एम. एस. धोनी'मधील अभिनेते कुमुद मिश्रा यांना कोरोनाची लागण, श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सध्या कुमुद ऑक्सिजन सपोर्टवर आहेत

'सुल्तान', 'एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' 'जॉली एलएलबी 2', ‘रुस्तम’, ‘रिव्हॉल्वर राणी’, ‘रांझणा’, ‘मुल्क’, ‘बदलापूर’, ‘थप्पड’, ‘एअरलिफ्ट’ आणि 'भारत' सारख्या अनेक चित्रपटांत झळकलेले अभिनेता कुमुद मिश्रा यांना श्वासोच्छवासाचा त्रास सुरु झाल्यानंतर मध्य प्रदेशातील रीवा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती.

सध्या कुमुद ऑक्सिजन सपोर्टवर आहेत
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, कुमुद यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. पण श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना सध्या ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. सुरुवातीला कुमुद यांच्या आईची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, आपल्या आईची काळजी घेत असताना कुमुद यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

NSD मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीचे सीनिअर होते कुमुद
कुमुद मिश्रा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीचे सीनिअर होते. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, "नवाज एनएसडीमध्ये माझे ज्युनिअर होते. मी त्यांचे सुरुवातीचे काम पाहिले आहे.' दोघांनीही वरुण धवन स्टारर 'बदलापूर' मध्ये एकत्र काम केले होते.

पत्नीदेखील आहे अभिनेत्री
कुमुद मिश्रा यांची पत्नी आयशा रझा ही बॉलिवूड अभिनेत्री आहे. 'मदारी', 'टॉयलेट: एक प्रेम कथा', 'सोनू के टीटू की स्वीटी' आणि 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. 2008 मध्ये कुमुद आणि आयशाचे यांचे लग्न झाले होते. दोना एक मुलगा असून कबीर त्याचे नाव आहे.

बातम्या आणखी आहेत...