आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह त्यांचा मुलगा, सून आणि नात यांना कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर मुंबई महापालिकेने अमिताभ बच्चन यांचा बंगला ‘जलसा’ कन्टेन्मेंट झोन म्हणून रविवारी जाहीर केला. तसा अधिकृत बॅनरच पालिका कर्मचाऱ्यांनी या बंगल्याबाहेर लावला. त्यामुळे या भागात आता कोणालाही प्रवेश करता येणार नाही. अमिताभ यांच्या जलसा आणि जनक या बंगल्यात राहणाऱ्या सगळ्यांची कोविड चाचणी झाली आहे. वृत्तानुसार या कुटुंबात काम करणा-या 26 सदस्यांची स्वॅब टेस्ट निगेटिव्ह आली आहे. तर कुटुंबातील उर्वरित सर्व सदस्य व स्टाफला क्वारंटाइन करण्यात आले आहे.
'ब्रीद: इंटू द शेडोज' या वेब सीरिजमध्ये अभिषेक बच्चन सोबत झळकणारा अभिनेता अमित साधचीदेखील कोविड टेस्ट झाली असून त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. अमित साधने सोमवारी ट्विटरवरुन ही माहिती दिली. त्याने लिहिले, "काळजी आणि प्रार्थना केल्याबद्दल धन्यवाद. ही अशी वेळ आहे जेव्हा मी आनंदाने सांगू शकतो की मी निगेटिव्ह आहे, जे लोक याच्याशी लढा देत आहेत, त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो", असे अमित म्हणाला आहे.
Thank you for your prayers and concerns. This is the only time I say happily I am negative. To all people battling this, my prayers and thoughts continue. Love you. Togetherness is the only strength ! 🙏🏻
— Amit Sadh (@TheAmitSadh) July 13, 2020
शनिवारी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना नानावटी रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. ताज्या रिपोर्टनुसार, रुग्णालयाच्या संबंधित सुत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे की, दोघांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. रुग्णालयातील इतर कोरोना रुग्णांना जे जेवण देण्यात येते तेच यांनाही देण्यात आले होते. या दोघांच्या सर्व चाचण्या व आवश्यक तपासणी नानावटी रुग्णालयाच्या क्रिटिकल केअर सर्व्हिसचे संचालक डॉ. अब्दुल समद अन्सारी यांच्या देखरेखीखाली करण्यात येत आहेत.
बिग बींची सून ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या यांचीही कोविड टेस्टही पॉझिटिव्ह आली आहे. तथापि, बीएमसीने त्यांना घरीच आयसोलेट केले आहे. अमिताभ यांच्या पत्नी जया बच्चन, मुलगी श्वेता बच्चन नंदा, नात नव्या नवेली आणि नातू अगस्त्य यांची कोविड-19 ची टेस्ट निगेटिव्ह आली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.