आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सेंट्रल क्राईम ब्रांचने बंगळुरूमधील एका ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत संजना गलरानी, रागिनी द्विवेदी, रवीशंकर अशा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक नामांकित कलाकारांची नाव समोर आली आहेत. या प्रकरणात बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयचा मेहुणा आदित्य अल्वाचेही नाव समोर आले आहे. आदित्यला पोलिसांनी नोटीस बजावला होती. त्यानंतर आता विवेकची पत्नी प्रियंका अल्वा हिला देखील चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार प्रियंका अल्वा हिला देखील नोटीस बजावली आहे. प्रियंका आणि आदित्य दोघे बहीण-भाऊ आहेत. त्यामुळे या ड्रग्ज प्रकरणात तिचाही हात असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात आता प्रियंका अल्वाची देखील चौकशी केली जाणार आहे.
City Crime Branch Bengaluru serves notice to Priyanka Alva Oberoi over links with brother Adithya Alva in connection with Sandalwood drug case. #Karnataka
— ANI (@ANI) October 16, 2020
CCB raided actor Vivek Oberoi's Mumbai residence in search of his relative Aditya Alva in connection with the case y'day.
गुरुवारी विवेकच्या घरावर छापा
आदित्यचा शोध घेण्यासाठी बंगळुरू पोलिसांच्या केंद्रीय गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी विवेक ओबेरॉयच्या मुंबईतील घरावर छापा मारला. विवेकचा मेहुणा आदित्य अल्वा बंगळुरू ड्रग्ज प्रकरणात आरोपी आहे. आदित्यच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार आहे. सीसीबीने कोर्टाचे वॉरंट घेऊन विवेकच्या घराची झडती घेतली गेली.
या छाप्यासंदर्भात एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, आदित्य अल्वा हा विवेक ओबेरॉयच्या घरात लपला असल्याची माहिती होती. बंगळुरू पोलिसांनी आदित्य अल्वाच्या घराचीही झडती घेतली आहे. आदित्य कर्नाटकचे माजी मंत्री जीवराज अल्वा यांचा मुलगा आहे.
आजवर यांना झाली अटक
अभिनेत्री रागिणी द्विवेदी, रविशंकर, शिवप्रकाश, राहुल शेट्टी आणि वीरेन खन्ना या ड्रग पेडलर्सला आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. रागिणीने ड्रग्ज चाचणीच्या वेळी मूत्रामध्ये पाणी मिसळून नमुना खराब करण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी तिचा नमुना पुन्हा घेतला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.