आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कन्नड फिल्म इंडस्ट्रीतील ड्रग रॅकेटचा भांडाफोड:अभिनेत्री रागिनी द्विवेदीने समन्स मिळताच आपला मोबाइल नंबर बदलला; गुन्हे शाखेने घरी छापा टाकून तिला ताब्यात घेतले

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 21 ऑगस्ट रोजी कर्नाटकमध्ये ड्रग रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर 15 सेलिब्रिटींची नावेही समोर आली.
  • 'वीर मदाकरी' सारख्या चित्रपटात झळकलेली कन्नड अभिनेत्री रागिनी समन्स मिळाल्यानंतरही सीसीबीसमोर हजर झाली नाही.

बॉलिवूडप्रमाणेच कन्नड फिल्म इंडस्ट्रीमध्ये ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड झाला आहे. यासंदर्भात शुक्रवारी सकाळी गुन्हे शाखेने बंगळूरमधील कन्नड अभिनेत्री रागिनी द्विवेदीच्या घरी छापा टाकला. सकाळी साडेसहाच्या सुमारास छापा टाकणा-या पथकात 6 पुरुष आणि महिला सहकारी होते. या अभिनेत्रीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. खरं तर, समन्स मिळाल्यानंतर रागिनीने आपला मोबाइल नंबर बदलला असल्याची माहिती सीसीबीला मिळाली होती. त्यामुळे सीसीबीच्या अधिका-यांनी कोर्टाकडून सर्च वॉरंट मिळवले आणि वॉरंट मिळताच रागिनीच्या घरी छापा टाकला.

  • 21 ऑगस्ट रोजी हे प्रकरण उघडकीस आले

21 ऑगस्ट रोजी, नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) मोठी कारवाई करत कर्नाटकमधील ड्रग्स रॅकेटचा भांडाफोड केला आणि अनेक ड्रग्ज पॅडलरला अटक केली. तपास जसजसा पुढे वाढत गेला तसतसे सँडलवूडशी संबंधित 15 सेलिब्रिटींची नावे समोर आली. चौकशीदरम्यान एजन्सीने रागिनीचा मित्र रवी याला अटक केली असता या प्रकरणात अभिनेत्रीचाही संबंध असल्याचे निदर्शनास आले.

  • रागिनी सीसीबीसमोर हजर झाली नव्हती

3 सप्टेंबरला रागिनीला सीसीबीसमोर हजर होण्यास नोटीस बजावण्यात आली. पण तिने तिचा वकील पाठवला व ती स्वत: गैरहजर राहिली. रागिनीने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या अनुपस्थितीचे कारण समन्स शॉर्ट नोटीसवर मिळाल्याचे सांगितले होते.

रागिनीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ती कायदेशीर प्रक्रियेचे पालन करते. म्हणून तिने तेथे आपली समस्या मांडण्यासाठी वकिलाला पाठवले होते. यासह, तिने लिहिले की सोमवारी सकाळी ती पोलिसांसमोर हजर होईल. तिच्या मते, तिच्याकडे लपवण्यासारखे काही नाही आणि सीसीबीमार्फत चौकशी होत असलेल्या कोणत्याही बेकायदेशीर कृतीशी तिचा संबंध नाही.

  • रागिनी 'आर ... राजकुमार' मध्ये दिसली होती

रागिनीने कन्नडमध्ये 'वीर मदाकरी', 'शंकर आयपीएस', 'व्हिलन', 'विक्ट्री' आणि 'शिवा' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. शाहिद कपूर स्टारर बॉलिवूड चित्रपट 'आर ... राजकुमार' मध्ये तिचा स्पेशल अपिअरन्स होता.