आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

इंडस्ट्रीला आणखी एक धक्का:अभिनेता रंजन सहगलचे मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे निधन, ‘सरबजीत’मध्ये ऐश्वर्या रायसोबत केलं होत काम  

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रंजन सहगलने वयाच्या 36 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
Advertisement
Advertisement

टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेता रंजन सहगलचे निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या 36 व्या वर्षी त्याने या जगाचा कायमचा निरोप घेतला. वृत्तानुसार, कार्डिअ‍ॅक अरेस्टचा झटका आल्यामुळे रंजनला रुग्णालयात भरती करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे त्याचे निधन झाले.  रंजनने छोट्या पडद्यावर 'क्राइम पेट्रोल'सह 'सावधान इंडिया', 'गुस्ताख दिल', 'तुम देना साथ मेरा', 'सबकी लाडली बेबो', 'कुलदीपक' आणि 'भंवर' सारख्या शोमध्ये काम केले होते.  

  • अनेक दिवसांपासून होता आजारी 

रंजन गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होता. त्याला श्वसनाचा त्रास होत होता. तो मुंबईत एकटाच राहात होता. परिणामी उपचारासाठी तो आपल्या गावी जीरकपुर (पंजाब) येथे गेला. दरम्यान त्याची तब्येत आणखी बिघडल्यामुळे अधिक चांगल्या उपचारासाठी त्याला चंदीगढ येथे नेण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. रंजनची करोना चाचणी देखील करण्यात आली होती परंतु त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.

  • सिंटाने वाहिली श्रद्धांजली 

सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन अर्थात सिंटाने रंजन सहगलच्या अकाली निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी अधिकृत ट्विटर हँडलवरून लिहिले, “सिंटा रंजन सहगलत्या निधनावर  मनापासून शोक व्यक्त करते. ते नोव्हेंबर 2010 पासून आमचे सदस्य होते.”

  • 6 वर्षांपूर्वी झाले होते लग्न 

वृत्तानुसार, रंजनने 2014 मध्ये कॉस्ट्यूम डिझायनर निव्या छाबराशी लग्न केले होते. ऐश्वर्या राय आणि रणदीप हुड्डा स्टारर'सरबजीत' या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. शाहरुख खानच्या ‘झिरो’ या चित्रपटातही तो दिसला होता. यासह रंजनने ‘यारा दा केचप’ आणि ‘माही एनआरआय’ या पंजाबी चित्रपटांमध्ये त्याने काम केले होते.

  • लॉकडाऊन दरम्यान अनेक सेलिब्रिटींनी घेतला कायमचा निरोप 

लॉकडाऊन दरम्यान, एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीतील अनेकांनी जगाचा निरोप घेतला आहे. यात इरफान खान, ऋषी कपूर, सुशांत सिंह राजपूत, जगदीप अशी मोठी नावे आहेत. गेल्या महिन्यात क्राइम पेट्रोल फेम अभिनेता सफीक अन्सारीचा कर्करोगामुळे मृत्यू झाला होता. तर 12 जुलै रोजी अभिनेत्री दिव्या चौकसे हिचेदेखील कर्करोगाने निधन झाले. 

Advertisement
0