आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माधव मिश्रा इज बॅक:'जीत हमेशा न्याय की होनी चाहिए...', 'क्रिमिनल जस्टिस'चा दमदार टिझर रिलीज

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'क्रिमिनल जस्टिस 3'चा हा टिझर व्हिडिओ प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे.

बॉलिवूड अभिनेते पंकज त्रिपाठी यांची महत्त्वाची भूमिका असलेल्या 'क्रिमिनल जस्टिस' या वेब सिरिजचा दमदार टिझर रिलीज झाला आहे. 34 सेकंदाच्या या टिझर व्हिडिओमध्ये पंकज त्रिपाठी हे माधव मिश्रा नावाच्या वकिलाच्या भूमिकेत दिसत आहेत. यावेळी क्रिमिनल जस्टिसची टॅग लाइन अधूरा सच ही आहे. पंकज म्हणजेच माधव मिश्रा देखील ''जीत आपकी या मेरी नहीं है, जीत हमेशा न्याय की होनी चाहिये।'', असे म्हणताना दिसतात. 'क्रिमिनल जस्टिस 3'चा हा टिझर व्हिडिओ प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे.

कधी रिलीज होणार क्रिमिनल जस्टिस 3?
या सिरिजचे यापूर्वीचे दोन सीझन खूप गाजले होते. आता क्रिमिनल जस्टिस 3 चा हा दमदार टिझर पाहिल्यानंतर चाहते या वेब सिरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता ही धमाकेदार वेब सिरिज कधी प्रदर्शित होणार, या चर्चेला सर्वत्र वेग आला आहे. निर्मात्यांनी अद्याप क्रिमिनल जस्टिस 3ची अधिकृत रिलीज डेट जाहीर केलेली नाही. पण पंकज त्रिपाठी यांची ही सिरिज पुढील महिन्यात डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...