आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Crisis On 5 Lakh Bollywood Workers With A Turnover Of 2.40 Lakh Crores, If The Lockdown Is Prolonged Then There Will Be A Loss Of 1000 Crores

मनोरंजन क्षेत्रातील वास्तव:2.40 लाख कोटींची उलाढाल असलेल्या बॉलिवूडमधील 5 लाख कामगारांवर संकट, जर लॉकडाऊन दीर्घकाळ चालला तर होईल 1000 कोटींचे नुकसान

राजेश गाबा9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज (FWICE) ने सरकारकडे सिनेसृष्टीतील संबंधित लोकांना अन्य घटकांसाठी (रिक्षावाले, फेरीवाल्यांपासून हातावर पोट असणा-या अनेक घटकांचा समावेश) जाहीर करण्यात आलेल्या मदत पॅकेजमध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्रात 15 दिवसांच्या लॉकडाउनमुळे चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग थांबले आहे. सेटवर काम करणारे 5 लाख तंत्रज्ञ, स्पॉटबॉय, मेकअप आर्टिस्ट आणि इतर क्रू मेंबर्ससमोर यामुळे पुन्हा एकदा रोजगाराचे संकट निर्माण झाले आहे. सुमारे 2.40 लाख कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या या इंडस्ट्रीतील तंत्रज्ञ आणि क्रू मेंबर्सना लॉकडाउनचा सर्वाधिक फटका बसला आहे. कारण- यातील बहुतेक लोक डेली वेजेसवर काम करतात.

फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (एफडब्ल्यूईसी) चे अध्यक्ष बीएन तिवारी आणि महासचिव अशोक दुबे यांनी दिव्य मराठीसोबतच्या खास संभाषणात या मुद्दयावर बातचीत केली. इतर घटकांसाठी जाहीर केलेल्या मदत पॅकेजमध्ये सिनेमाशी संबंधित व्यक्तींचा समावेश करण्याची मागणी महासंघाने केली आहे.

अर्थमंत्र्यांसमोरही बाजू मांडली
अध्यक्ष बीएन तिवारी यांनी सांगितल्यानुसार, फेडरेशनने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडेही आपले म्हणणे मांडले आहे. ते म्हणतात, फिल्म इंडस्ट्री वर्षाकाठी 2.40 लाख कोटींची उलाढाल करते. अनेक प्रकारचे कर सरकारला मिळतात. हा उद्योग देखील देशाचा एक भाग आहे. सरकारकडून थोडीशी मदत मिळाल्याने प्रत्येकाचे आयुष्य बदलणार नाही, परंतु सरकार आमच्या पाठीशी उभे आहे असे आम्हाला वाटेल. आमच्याकडे सर्व कामगारांच्या बँक खाती, पॅन नंबर आहेत. सरकारने आपला हात पुढे केला पाहिजे, आम्ही सर्व व्यवस्था करू.

लॉकडाउन लांबले तर एक हजार कोटी रुपयांचे मोठे नुकसान
तिवारी सांगतात की, फिल्म इंडस्ट्री मोठ्या अडचणीतून रुळावर आली होती. या वेळी 15 दिवसांचा लॉकडाउन आहे, मात्र जर लॉकडाउनचा कालावधी वाढला तर इंडस्ट्रीला कमीत कमी एक हजार कोटींचे नुकसान होईल. ही नैसर्गित आपत्ती आहे. यात आम्ही सरकारसोबत उभे आहोत, बायो बबलसह मार्गदर्शक सूचनांनुसार शूटिंग करण्याची परवानगी मिळावी अशी आम्ही सरकारकडे मागणी करू.

आर्थिक पॅकेजमध्ये सिने कर्मचार्‍यांचा देखील समावेश करा
फेडरेशनचे महासचिव अशोक दुबे म्हणाले की, 15 दिवसांच्या लॉकडाउनमध्ये आम्ही सरकारला पाठिंबा देऊ, पण सरकारनेही आम्हाला मदत केली पाहिजे. डेली वेजेस कामगारांचा विचार केला पाहिजे. इतर घटकांसाठी सरकारने 5,500 कोटींचे पॅकेज दिले आहे, सिने कर्मचार्‍यांनाही त्यात सामावून घ्यायला हवे, अशी मागणी दुबे यांनी केली आहे.

फिल्मसिटीमध्ये होणार लसीकरण
अशोक दुबे यांच्या मते फेडरेशनने सरकारला पत्र लिहून कळवले होते की, दिवसभर येथे काम करणा-या कर्मचार्‍यांना लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर जाऊन रांगेत उभे राहणे शक्य नाही. आमचे म्हणणे ऐकले गेले आणि नियम बदलण्यात आले. फिल्मसिटीमध्ये दररोज 8 ते 10 हजार लोक काम करतात. आता फिल्मसिटीमध्येच त्यांच्यासाठी लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

यश राज फिल्म्सने त्यांच्यासाठी काम करणा-या सर्व लोकांचे लसीकरण करणार असल्याचे सांगितले आहे. जर एखादा निर्माता पुढे आला तर अधिक निर्मातेही पुढे येतील. फेडरेशनने कमी दरात चाचणीसाठी विक्रम भट्ट यांच्या पाठिंब्याने व्यवस्था केली आहे. येथे कार्यरत लोक 850 ऐवजी 550 रुपयांमध्ये आरटी-पीसीआर चाचणी करु शकतील. ही चाचणी दर सात दिवसांनी केली जाईल, असेही दुबे यांनी सांगितले.

कामगारांना साइटवर राहण्याची परवानगी द्यावी
यशराज फिल्म्सच्या म्हणण्यानुसार, कंस्ट्रक्शन इंडस्ट्रीत जे कामगार साइटवर राहतात, त्यांना काम सुरु ठेवण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. आमच्या कामगारांनासुद्धा सेटवर राहून काम करण्याची मुभा द्यावी, असे आम्ही आवाहन करू, असे यशराज फिल्म्सने म्हटले आहे.

32 क्राफ्ट असोसिएशनचे फेडरेशन
एफडब्ल्यूआयसी ही 70 वर्षे जुनी फेडरेशन आहे. यात 32 क्राफ्ट असोसिएशन आहेत. या संघटनांमध्ये एकूण 5 लाख लोक आहेत. यात कलाकार, व्हिडिओ एडिटर्स, आर्ट डायरेक्टर, कॉश्च्युम डिझायनर, टीव्ही डायरेक्टर, फोटोग्राफी स्टिल अँड मूव्हिंग, गायक, बाउन्सर, कॅमेरा तंत्रज्ञ, डबिंग कलाकार, कर्मचारी, ज्युनिअर आर्टिस्ट, स्टंटमेन, वेशभूषाकार, संगीतकार, स्क्रीन लेखक, डान्सर्स आणि मॉडेल्ससह क्राफ्ट्स आणि व्यावसायिकांच्या असोसिएशनचा यात समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...