आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिव्ह्यूचा रिव्ह्यू:अक्षय कुमारच्या 'बच्चन पांडे'ला समीक्षकांनी म्हटले नॉन-स्टॉप आणि मास-एंटरटेनर, जाणून घ्या का होतेय चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रिलीज डेट - 18 मार्च 2022
  • कलाकार - अक्षय कुमार, जॅकलिन फर्नांडिस, क्रिती सेनन, अर्शद वारसी
  • दिग्दर्शक- फरहाद सामजी

अक्षय कुमार स्टारर 'बच्चन पांडे' हा चित्रपट 18 मार्च रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, क्रिती सेनन, जॅकलिन फर्नांडिस आणि अर्शद वारसी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपट समीक्षकांच्या मते हा चित्रपट मास एंटरटेनर आहे. दुसरीकडे मात्र सोशल मीडियावर या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होत आहे. चला जाणून घेऊया चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एकूण त्याला कसा प्रतिसाद मिळतोय-

एक नजर क्रिटिक्सच्या रिव्ह्यूवर -

तरण आदर्श- चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी चित्रपटाला पाचपैकी साडे तीन स्टार देऊन त्याचे कौतुक केले आहे. त्यांनी लिहिले, "बच्चन पांडे - मास एंटरटेनर. 5 पैकी साडेतीन रेटिंग. नॉन स्टॉप एंटरटेनर. अक्षय कुमार अ‍ॅक्शन, मॅसी रोलमध्ये उत्कृष्ट आहे. ज्या लोकांना हार्डकोर एंटरटेन्मेंट हवे आहे त्यांना लक्षात घेऊन हा चित्रपट बनवला गेला आहे. लोक शिट्ट्या आणि टाळ्या वाजवतील."

सुमित कडेल- चित्रपट समीक्षक सुमित कडेल यांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे आणि लिहिले, "बच्चन पांडे हा अ‍ॅक्शन, कॉमेडी आणि ड्रामा असलेला एक उत्कृष्ट मनोरंजन करणारा चित्रपट आहे. अक्षय कुमार बच्चनच्या भूमिकेत रांगडा आहे. तो खूप भीतदायक आणि तेवढचा मजेदार आहे."

सोशल मीडियावरून..

'बच्चन पांडे' रिलीज झाल्यापासून ट्विटरवर चित्रपट आणि बॉलिवूडवर बहिष्कार घालण्याची मागणी होत आहे. याचे कारण म्हणजे चित्रपटाचा मुख्य नायक पंडित असूनही त्याला गुंड असल्याचे दाखवण्यात आले आहे. लोकांनी या चित्रपटावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. बॉलिवूड चित्रपटांमधून हिंदूंची प्रतिमा मलिन होत असल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे.

एक नजर टाकुया सोशल मीडियावरील लोकांच्या प्रतिक्रियांवर...

पहिल्या दिवशी झाली 13.25 कोटींची कमाई
'बच्चन पांडे' या चित्रपटाची अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधूनच सुमारे साडेचार कोटी रुपयांची कमाई झाली आहे. तरण आदर्श यांनी ट्विट करत चित्रपटाने पहिल्या दिवशी 13.25 कोटींची कमाई केली असल्याची माहिती दिली आहे. हा चित्रपट होळीच्या दिवशी प्रदर्शित झाल्याने मुंबई आणि गुजरात येथे दुपारनंतर त्याचे शो सुरु झाले. वीकेंडमध्ये चित्रपटाच्या लेक्शनमध्ये वाढ होण्याची अपेक्षा असल्याचे तरण आदर्श यांनी म्हटले आहे. हा चित्रपट 150 कोटींमध्ये बनला आहे.

चित्रपटाचा ट्रेलर-

बातम्या आणखी आहेत...