आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वादग्रस्त वक्तव्य:राम गोपाल वर्मांनी दाऊद इब्राहिमला दिले आपल्या यशाचे श्रेय, म्हणाले - 'गँगस्टर सारख्या चित्रपटांसाठी मी..'

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका वक्तव्यामुळे राम गोपाल वर्मा हे मोठ्या वादात अडकण्याची शक्यता आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा लवकरच 'डी कंपनी' हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. या चित्रपटातून ते पुन्हा एकदा मुंबईतील गँगस्टर्सची कहाणी दाखवणार आहेत. राम गोपाल वर्मा यांचे अनेक चित्रपट मुंबईतील गँगवॉरवर आधारित आहेत. आता ते पुन्हा एकदा अशीच एक कहाणी घेऊन येत आहेत. याच चित्रपटासंदर्भात दिलेल्या एका मुलाखतीत रामू यांनी गँगस्टर दाऊद इब्राहिमचे आभार मानले आहेत.

अलीकडेच रामू यांनी स्पॉटबॉयला एक मुलाखत दिली आहे. त्या मुलाखतीमधील त्यांच्या एका वक्तव्यामुळे राम गोपाल वर्मा हे मोठ्या वादात अडकण्याची शक्यता आहे. मोस्ट वॉटेंड आतंकवादी दाऊद इब्राहिमचे आभार राम गोपाल वर्मा यांनी मानले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, गँगस्टर सारख्या चित्रपटांसाठी मी दाऊद इब्राहिमचा आभारी आहे.

ते म्हणाले, 'मी दाऊद इब्राहिमचा आभारी आहे. मी गँगस्टर्सवर आधारित चित्रपट तयार करुन आपले करिअर बनवले. खरं सांगायचं तर मला मनुष्याची डार्क साइड दाखवण्यात जास्त रुची आहे.'

ते पुढे म्हणाले, 'डी कंपनी हा चित्रपट मी इनसाइडर्सकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे बनवला आहे. 2002 मध्ये आलेल्या माझ्या चित्रपटात दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन यांच्यातील वादावर आधारित होता आणि यावेळी देखील मी एक सत्य घटना घेऊन येत आहे.'

आता राम गोपाल वर्मा यांच्यावर सर्वच स्तरातून टिका होऊ लागली आहे. ते सध्या याच चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत.​​​​​​​

'डी कंपनी'चा टीझर रिलीज, अमिताभ यांनी केले कौतुक
राम गोपाल वर्मा यांनी शनिवार 'डी कंपनी' या चित्रपटाचा टीझर रिलीज केला. दाऊद इब्राहिमवर आधारित या चित्रपटाच्या टीझरचे अमिताभ यांनी कौतुक केले आहे. त्यांनीही सोशल मीडियावर चित्रपटाचा टीझर शेअर केला. त्यांनी चित्रपटासाठी रामू यांचे तोंडभरुन कौतुक केले आहे.

या चित्रपटात एक नवोदित दाऊद इब्राहिमच्या भूमिकेत दिसणार आहे. अक्षत कांत हे या अभिनेत्याचे नाव आहे. अक्षतची निवड 35 ऑडिशननंतर केली, असे रामू यांनी सांगितले.