आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपकमिंग वेब सीरिज:माधवन-सुरवीनच्या ‘डी-कपल्ड’मध्ये मुलीमुळे घटस्फाेट घेऊ न शकणाऱ्या दांपत्याची कथा, 3 दिवसांचे पॅचवर्क उरले

अमित कर्ण2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 45 दिवसांचे झाले शूटिंग

‘सेक्रेड गेम्स’ आणि 'जामताडा’ सारख्या प्राेजेक्ट्समधून निम्न व मध्यमवर्गाच्या भारतीय प्रेक्षकांना नेटफ्लिक्सने टार्गेट केले होते. आता ते आपल्या आगामी मूळ सीरिज ‘डी-कपल्ड’च्या माध्यमातून उच्चवर्गीय प्रेक्षकांना टार्गेट करू पाहत आहे. या सीरिजमध्ये आर माधवन आणि सुरवीन चावला मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सूत्रानुसार, नेटफ्लिक्सने बॉम्बे फेबल्स प्रॉडक्शन्सला उच्च मध्यम वर्गाच्या प्रेक्षकांना लक्ष्य करण्यासाठी अशी सीरिज बनवण्याची मागणी केली होती. त्याची कथा एखाद्या श्रीमंत व्यक्तीची असावी, असे सांगण्यात आले होत. त्या अंतर्गत ही सीरिज बनवण्यात आली आहे. सध्या मुंबईत याचे पॅचवर्क सुरू आहे. यापूर्वी नेटफ्लिक्सने 'बॉम्बे बेगम्स’देखील बनवली होती. त्याची कथा एका मोठ्या श्रीमंत व्यक्तीवर आधारित होती.

बँकर बनली सुरवीन, लेखक आहे माधवन
‘डी-कपल्ड’मध्ये घटस्फोटापर्यंत पोहोचलेल्या एका जोडप्याची कथा आहे. माधवन यात लेखक आहे तर त्याची पत्नी सुरवीन एक इन्व्हेस्टमेंट बँकर बनली आहे. दोघांचे घटस्फोटाचे कारण वेगळे आहे. दोघांना वेगळे व्हायचे आहे. मात्र त्यांना एक 10 वर्षाची मुलगी असते, तिच्यामुळे ते घटस्फोट घेऊ शकत नाहीत. वेगळे झाल्यानंतर ते आपल्या मुलीला काय म्हणतील, यात ते गोंधळलेले असतात.

'रूही' फेम हार्दिक आहेत दिग्दर्शक
आतापर्यंत या सीरिजचे 45 ते 47 दिवसांचे शूटिंग पूर्ण झाले आहे. याचे शूटिंग लॉकडाऊन संपल्यावर सुरू झाले हाेते. आता याच्या 3 दिवसांचे पॅचवर्क उरले आहे. ते पूर्ण केले जात आहे. ‘रूही’ फेम दिग्दर्शक हार्दिक मेहता याचे दिग्दर्शक आहेत. पोशाख अथिया टेकचंदानी यांनी तयार केला आहे.

30 लाखांत बस डेपोचे बनवले विमानतळ लाउंज
‘डी-कपल्ड‘चे चित्रीकरण ग्लॅमरस आणि भव्य करण्यात आले. यात हाय क्लास सोसायटी दाखवण्यासाठी प्रचंड खर्च करण्यात आला आहे. गुरुग्राममध्ये बंगला भाड्याने घेण्यात आला. त्याला उच्चभ्रू सोसायटीत असलेल्या मोठ्या भवनासारखे बनवण्यात आले. त्यावर सुमारे 25 लाख रुपये खर्च करण्यात आला. याशिवाय दिल्ली येथील कश्मिरी गेट येथील आयएसबीटी बस डेपोला िवमानतळात बदलण्यात आले. लाउंज भाग आणि कॅफेटेरिया बनवण्यात आले. यासाठी 30 लाख रुपये खर्च करण्यात आले. एक हाय क्लास पार्टीसाठी सर्वांना गोव्याचा सफर घडविली.

बातम्या आणखी आहेत...