आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Dabangg Actress Sonakshi Sinha Clarifies On Non Bailable Warrant Against Her, Said This Is Pure Fiction And The Work Of A Rogue Individual Trying To Harass Me

फ्रॉड केस:फसवणूक प्रकरणी सोनाक्षी सिन्हाची पहिली प्रतिक्रिया आली समोर, म्हणाली- माझ्याविरोधात कोणतेही वॉरंट जारी करण्यात आलेले नाही

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • माझ्याविरुद्ध कोणतेही वॉरंट जारी केलेले नाही

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या विरोधात फसवणूक केल्याप्रकरणी अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. आता सोनाक्षी सिन्हाने सोशल मीडियावर या प्रकरणावर एक निवेदन जारी केले आहे. ज्यात तिने या बातम्या खोट्या असल्याचे म्हटले आहे. आपल्याविरुद्ध कोणतेही वॉरंट जारी करण्यात आलेले नाही, असेही तिने स्पष्ट केले आहे.

या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना सोनाक्षी सिन्हाने पोस्ट शेअर करत लिहिले की, "माझ्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आल्याच्या खोट्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये येत आहेत. ही बातमी कोणत्याही प्राधिकरणाकडून पडताळणी न करता चालवली जात आहे. ही बातमी खोटी असून मला त्रास देण्याचा प्रयत्न करणाऱ्या दुष्ट व्यक्तीचे काम आहे. मी सर्व मीडिया हाऊस, पत्रकार आणि वार्ताहरांना विनंती करते की, ही खोटी बातमी पसरवू नका. कारण ती प्रसिद्धी मिळवण्यासाठी या व्यक्तीचा एक अजेंडा आहे."

माझ्याविरुद्ध कोणतेही वॉरंट जारी केलेले नाही
सोनाक्षी पुढे म्हणाली की, तिची लीगल टीम या प्रकरणी कायदेशीर कारवाई करत आहे. ती म्हणाली, "हा माणूस प्रसिद्धी आणि माझ्या प्रतिष्ठेवर हल्ला करून, मीडियामध्ये अशा खोट्या बातम्या पसरवून माझ्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत आहे. कृपया त्याच्या कटात सहभागी होऊ नका. हे प्रकरण मुरादाबाद न्यायालयात आणि अलाहाबाद उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयाने यावर स्थगिती दिली आहे. न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल माझी कायदेशीर टीम त्या व्यक्तीवर आवश्यक ती सर्व कारवाई करेल. जोपर्यंत मुरादाबाद न्यायालय या प्रकरणाचा निकाल देत नाही तोपर्यंत हे माझे एकमेव विधान असेल. त्यामुळे कृपया या प्रकरणाबद्दल माझ्याशी संपर्क साधू नका. मी घरी आहे आणि मी तुम्हाला खात्री देते की माझ्याविरुद्ध कोणतेही वॉरंट जारी केलेले नाही."

2019 मध्ये सोनाक्षीवर दाखल करण्यात आला होता गुन्हा
रिपोर्ट्सनुसार, उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधील कटघर पोलीस स्टेशन परिसरात राहणारे आयोजक प्रमोद शर्मा यांनी फेब्रुवारी 2019 मध्ये सोनाक्षीविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. प्रमोद यांनी सोनाक्षीवर दिल्लीतील एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्यांच्याकडून 37 लाख रुपये घेतल्याचा आरोप केला होता. पण, पैसे घेऊनही सोनाक्षीने कार्यक्रमाला हजेरी लावली नव्हती. यानंतर इव्हेंट आयोजकाने पैसे परत मागितले असता सोनाक्षीच्या मॅनेजरने पैसे परत केले नाहीत. वृत्तानुसार, उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील एसीजेएम कोर्टाने या प्रकरणी अभिनेत्रीविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. यासोबतच तिला 25 एप्रिलला न्यायालयात हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

सोनाक्षी सिन्हाचे आगामी प्रोजेक्ट्स
सोनाक्षी सिन्हा अलीकडेच सलमान खान, दिशा पाटनी, पूजा हेगडे आणि इतरांसोबत 'द-बँग' टूरवरून परतली. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर सोनाक्षी लवकरच आगामी 'डबल एक्सएल' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत हुमा कुरेशीही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाशिवाय सोनाक्षी रितेश देशमुख आणि साकिब सलीमसोबत 'ककुडा'मध्ये दिसणार आहे. ती शेवटची 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया'मध्ये दिसली होती. यात अजय देवगण, शरद केळकर, नोरा फतेही, संजय दत्त यांच्याही प्रमुख भूमिका होत्या.

बातम्या आणखी आहेत...