आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दबंग'ला 10 वर्षे पूर्ण:एक राष्ट्रीय आणि सहा फिल्मफेअरसह सलमानच्या ‘दबंग’ने मिळवले होते एकूण 100 पुरस्कार, वाचा 10 रंजक गोष्टी

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चित्रपटात चुलबुल सलमानने आपल्या शैलीत प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले.

सलमान खानच्या अभिनयाने सजलेल्या “दबंग’ चित्रपटाला आज रिलीज होऊन 10 वर्षे झाली. देशात 138 कोटी आणि जगभरात 221 कोटींचा व्यवसाय करून 2010 मध्ये सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला होता. जाणून घ्या या चित्रपटाविषयी 10 गोष्टी...

या चित्रपटाची कहाणी पोलिस निरीक्षक चुलबुल पांडे (सलमान खान)वर आधारित आहे. तो आपल्या शैलीत भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देताे आणि स्वत:ला रॉबिनहूड पांडे म्हणवताे. चुलबुलच्या भावाची भूमिका अरबाज खानने केली होती आणि खलनायकाची भूमिका सोनू सूदने केली होती. शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी सोनाक्षी सिन्हाने या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. चित्रपटात चुलबुल सलमानने आपल्या शैलीत प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. चित्रपटाशी संबंधित काही मजेशीर किस्से...

1. यापूर्वी सोनाक्षी सिन्हाला फॅशन डिझायनर बनण्याची इच्छा होती. त्यासाठी ती एक कोर्सही करत होती. पण सलमान खान आणि त्याच्या कुटुंबाच्या सांगण्यावरून तिने अभिनेत्री म्हणून बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवले. रज्जो या व्यक्तिरेखेसाठी तिने बरेच वजन कमी केले.

2. दबंगमध्ये डान्स करताना सोनाक्षी सिन्हाने एक चष्मा घातला होता. हा चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर, सोनाक्षी या चष्म्याला शुभ मानू लागली. ती नेहमी चष्मा स्वत:कडे ठेवते. ‘राउडी राठौर’ आणि ‘दबंग २’ च्या शूटिंग दरम्यान तिने तोच चष्मा वापरला होता. एका मुलाखतीत तिने सांगितले होते, ती या चष्म्याला लकी मानते, घालायचा नसला तेव्हा ती आपल्या पर्समध्ये ठेवते.

3. ओमपुरी, चित्रपटाच्या दिग्दर्शकावर भडकले होते, कारण त्यांनी सलमानसोबतच त्यांचे काही विनोदी सीन कापले होते. त्यांचे सलमानसोबतचे बरेच सीन होते मात्र दिग्दर्शकांनी ते छोटे करत तीनमध्येच त्यांचे काम दाखवले.

4. सोनू सूदने सुरुवातीला हा चित्रपट करण्यास नकार दिला होता. नकारात्मक भूमिकेसोबत थोडा विनोदही दाखवावा अशी त्याची इच्छा होती. त्यानेच निर्मात्यांना हा सल्ला दिला होता. सोनूने सुचवले होते, त्याचे पात्र आपल्यासोबत एक फोटोग्राफर घेऊन चालले. तो बोलता-बोलता भैयाजी स्माइल असे म्हणेल. हा आयडिया सोनूच्या कॉलेजच्या काळातला आहे. त्याचा रूममेट त्याच्यासोबत एक फोटोग्राफर ठेवत होता तो नेहमी त्याचे फोटो काढायचा. सोनू त्यावेळी ते पाहून चकित झाला होता.

5. दबंग, एकल पडद्याच्या प्रेक्षकांना परत आणण्यास यशस्वी राहिला. चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात 51 कोटींची कमाई केली होती. त्यापैकी 18 कोटी रुपये सिंगल स्क्रीन थिएटरमधून कमवले होते. याने 'गजनी’, 'एक था टायगर’, 'चेन्नई एक्स्प्रेस’ आणि 'बॉडीगार्ड’ सारख्या माेठ्या चित्रपटांचा विक्रम मोडला होता.

6. दबंगमध्ये सलमानने पहिल्यांदाच मिशा ठेवल्या होत्या. अरबाज खानने एका मुलाखतीत सांगितले होते, ही आयडिया सलमानची होती, त्यालाही ती आवडली होती.

7. एका अॅक्शन सीनच्या शूटिंगमध्ये सोनू सूदच्या नाकावर सलमानने ठाेसा मारल्यावर त्याच्या नाकातून खूप रक्त येत होते. त्याला पटकन रुग्णालयात नेण्यात आले पण तेथे लाइट नव्हती. सोनूने तशाच अवस्थेत शूटिंग केले, यावरुन वादही झाला होता. विमानाने मुंबईला परत येऊन आपला उपचार करुन सोनूने परत यावे, असे त्याला सांगण्यात आले होते.

8. या चित्रपटाने एकूण 6 फिल्मफेअर पुरस्कार आणि 1 राष्ट्रीय पुरस्कारासह 100 पुरस्कार आपल्या नावी केले होते. यापैकी 10 पुरस्कार तर सलमानला मिळाले होते.

9. ‘दबंग’ च्या लेखकाने आधी चुलबुल पांडेची भूमिका दुसऱ्यासाठी लिहिली होती. त्यांच्या मत, त्याच्यापेक्षा दुसरा कोणीच दबंग नाही. मात्र ते जेव्हा आपली स्क्रिप्ट घेऊन अरबाजकडे गेले तेव्हा सलमानमुळे यात काही बदल करण्यात आले. सलमानने यात बऱ्याच गोष्टी सुचवल्या.

10. चित्रपटातील गाणे ‘मुन्नी बदनाम हुई...’ मध्ये सलमानने जो डान्स केला आहे, तो एक नव्हे तीन लोकांकडून घेतला आहे. बेल्टची स्टेप सलमानच्या डॉ. भारत मामूंची होती, जे लंडनमध्ये राहतात. दोन्ही हात उचलण्याची स्टेप अरबाजची होती, तर मान हलवण्याची स्टेप मेकअपमॅन राजूची होती.

  • शूटिंगदरम्यान सलमान जेवणासाठी सर्वात आधी मला बोलवायचा : टीनू आनंद

दबंगपूर्वी मी सलमान खान सोबत दोन-तीन चित्रपट केले आहेत. जेव्हा मला कळले, त्याचा भाऊ अरबाज खान निर्माता झाला आहे आणि त्याने मला काम करण्यासाठी बोलावले, तेव्हा मला खूप आनंद झाला. मी जेव्हा त्यांना भेटायला गेलो तेव्हा मी दोघांनाही भेटलो. सलमान आणि अरबाज खान. त्यावेळचा एक किस्सा मला आठवताे, त्यांनी सांगितले, आम्ही तुम्हाला साइन करू इच्छित आहोत, तेव्हा तुम्ही किती पैसे घेणार? मी म्हणालो, मला पैसे नको. मी जोपर्यंत काम करेन, तुमच्या घरातून जेवण आले पाहिजे. मला सलमानच्या घरचे भोजन खूप आवडते, कारण मी सलीम साहेबांसोबत त्यांच्या घरी बऱ्याच वेळा जेवलो आहे. त्यानंतर ते म्हणाले, हे तर फारच महागात पडेल, तुम्ही तुमची किंमत सांगा. आम्ही तुम्हाला पैसे देऊ. आम्ही हे वचन देऊ शकत नाही. नंतर जेव्हा शूटिंग असायचे तेव्हा सलमानच्या घरुन दोन टिफिन यायचे. सलमान मला सर्वात आधी हाक मारायचा. डब्बा आला आमच्यासोबत जेवण करा.

(शब्दांकन : उमेशकुमार उपाध्याय)

बातम्या आणखी आहेत...