आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2022 मध्ये प्रदर्शित झाले 6 बायोपिक चित्रपट:10 वर्षांच्या हिट फिल्मच्या शर्यतीत 'दंगल' टॉपवर, 'चक दे ​​इंडिया' बॉलिवूडचा पहिला स्पोर्ट्स बायोपिक

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदी पट्ट्यातील प्रेक्षकही बॉलिवूड चित्रपटांपेक्षा साऊथचे चित्रपट अधिक पसंत करत आहेत. याचे मोठे कारण म्हणजे साऊथच्या चित्रपटांमध्ये अ‍ॅक्शन आणि इमोशनचा तडका असतो आणि बॉलिवूडमध्ये रिमेक आणि बायोपिक चित्रपटांचा ट्रेंड दिसून येतो. विकी कौशलचा आगामी सॅम बहादूर हा देखील एक बायोपिक चित्रपट आहे. त्याची कथा फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित आहे.

2022 च्या या सात महिन्यांत सुमारे 6 बायोपिक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. यातील 'गंगूबाई काठियावाडी', 'रॉकेट्री: द नंबी इफेक्ट' आणि 'मेजर' यांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली, तर 'झुंड, 'सम्राट पृथ्वीराज', 'शाबाश मिठू' सारखे चित्रपट सरासरी कमाईच्या पुढे जाऊ शकले नाहीत.

बायोपिक चित्रपटांची सुरुवात कशी झाली?

बायोपिक चित्रपट म्हणजे वास्तविक, ऐतिहासिक किंवा लिजेंड व्यक्तीच्या जीवनावर आधारित चित्रपट. जगातील पहिल्या बायोपिक चित्रपटाचे श्रेय जोन ऑफ आर्क यांना दिले जाते.

'संजू', 'भाग मिल्खा भाग', 'एमएस धोनी' आणि 'मेरी कोम' सारख्या बायोपिक चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप सोडली. एखाद्या व्यक्तीची कथा चांगल्या पद्धतीने पडद्यावर आणली, तर लोकांना ती नक्कीच पाहायला आवडते, हे या चित्रपटांनी सिद्ध केले आहे.

गेल्या काही वर्षांत बायोपिक चित्रपटांचा ट्रेंड वाढला आहे. राजकारण असो, खेळ असो किंवा एखादी मोठी घटना असो, जवळजवळ प्रत्येक जॉनरवर बायोपिक चित्रपट बनवले गेले आहेत.

2007 मध्ये आलेला 'चक दे ​​इंडिया' हा बॉलिवूडचा पहिला स्पोर्ट्स बायोपिक आहे. हा चित्रपट भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक मीर रंजन नेगी यांच्या जीवनावर आधारित आहे.

राजकीय पात्रांवर बनलेले हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसे यशस्वी झालेले नाहीत. 2017 मध्ये 'इंदू सरकार'च्या अपयशानंतर 'द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर', 'ठाकरे' आणि 'पीएम नरेंद्र मोदी' यापैकी एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही.

'द गुड महाराजा', 'द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव', 'सॅम बहादूर' आणि 'गोरखा' हे बायोपिक चित्रपट येत्या काही दिवसांत प्रदर्शित होणार आहेत. आता हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई करण्यात यशस्वी होतात का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...