आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊन बर्थडे:सनी लिओनीच्या वाढदिवसानिमित्त पतीने लिहिली भावनिक पोस्ट, अभिनेत्रीने शुभेच्छांसाठी मानले सर्वांचे आभार

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सनी लिओनीचा जन्म 13 मे 1981 रोजी झाला होता. तिचे खरे नाव करणजीत कौर वोहरा आहे.

अभिनेत्री सनी लिओनीने बुधवारी आपला 40 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने तिचा नवरा डॅनियल वेबरने सोशल मीडियावर तिला शुभेच्छा देऊन एक भावनिक पोस्ट लिहिली. आपल्या पोस्टमध्ये डॅनियने सनीचे चांगली पत्नी, आई आणि प्रेयसी असल्याचे वर्णन केले आहे. दुसरीकडे, व्हिडिओ संदेशाद्वारे सनीने तिच्या सर्व चाहत्यांचे शुभेच्छा दिल्याबद्दल आभार मानले. तिने स्वत: ला भाग्यवान म्हटले आहे. डॅनियलने सनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना लिहिले, "वाढदिवसाच्या शुभेच्छा, तू माझ्यासाठी खूप काही आहेस आणि मी रोज प्रार्थना करतो की माझ्या मनात जे काही येते ते मी तुला सांगू शकेन. तू एक चांगली पत्नी, आई आणि प्रेयसी आहेस, तू लाखो लोकांसाठी प्रेरणा आणि एक आदर्श आहेस.'

पुढे त्याने लिहिले की, 'आयुष्यात कोण काय विचार करेल याची चिंता न बाळगता तू स्वतःचा मार्ग निवडला. तोही जेव्हा तुला या प्रवासाचा फारसा अनुभव नव्हता. स्वत:वर आणि इतके नम्र होऊन तू जे काही साध्य केले त्याचा अभिमान बाळग. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे… लव्ह यू बेबी लव्ह सनी लिओनी.'

सनीने स्वत: ला भाग्यवान म्हटले

सनीने तिचा थँक यू व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले की, 'शुभेच्छा दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. मी खूप भाग्यवान आहे की तुम्ही सर्व माझ्या आयुष्याचा भाग आहात.' त्याच वेळी, आपल्या व्हिडिओमध्ये तिने स्वत:ला भाग्यवान म्हटले आहे.  ती म्हणाली, "मला माहित आहे की आम्ही बरेच दूर आहोत आणि गोष्टी करणे याक्षणी खूप अवघड आहे. पण गोष्ट लक्षात ठेवा आणि ती म्हणजे माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि मला आशा आहे की या कठीण काळात तुम्ही मोठ्या हिंमतीने सामोरे जाल.' या व्हिडिओमध्ये सनी विदाऊट मेकअप दिसतेय.

अरबाजच्या मैत्रिणीने सनीचे कौतुक केले

अरबाज खानची मैत्रीण जॉर्जिया एंड्रियानीने सनीच्या पोस्टवर कमेंट केले असून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि तिच्या लूकचे कौतुक केले. जॉर्जियाने लिहिले, "वाढदिवसाच्या शुभेच्छा सनी, तूू मेकअपशिवाय आणखीन सुंदर दिसते." दुसरीकडे अभिनेत्री एव्हलिन शर्मानेही सनीला शुभेच्छा दिल्या. एव्हलिनने लिहिले, 'हॅपी बर्थडे हनी, आनंद वाटला की, तुम्ही लोक लॉस एंजिलिसमध्ये सुखरूप पोहोचलात. भरपूर प्रेम.'

सनी काही दिवसांपूर्वी आपल्या कुटुंबासमवेत अमेरिकेत पोहोचली होती

दोन दिवसांपूर्वी सनीने एक फोटो शेअर केला होता ज्यात तिने लॉकडाऊनदरम्यान पती आणि तीन मुले निशा, नोहा आणि आशेर यांच्यासह अमेरिकेच्या लॉस एंजिलिसमध्ये पोहोचल्याने सांगितले होते. आपल्या पोस्टमध्ये तिने लिहिले की इथे तिची मुले कोरोना विषाणूपासून पूर्णपणे सुरक्षित असतील. या फोटोत ती बागेत तिन्ही मुलांसमवेत दिसली होती. यापूर्वी सनी संपूर्ण कुटुंबासमवेत भारतात राहात होती.

बातम्या आणखी आहेत...