आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेता दर्शनला वादग्रस्त वक्तव्य भोवले:भर कार्यक्रमात अभिनेत्याला चप्पलेचा मार, म्हणाला होता - सौभाग्यदेवतेचे कपडे काढा!

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनोरंजनसृष्टीत कलाकार अनेक वादग्रस्त वक्तव्य करत असतात. त्यामुळे त्यांना टीकेचा सामना करावा लागतो. असेच काहीसे कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता दर्शनच्या बाबतीत घडले आहे. दर्शनने काही दिवसांपूर्वी भाग्य देवीबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याचा परिणाम म्हणजे आता एका व्यक्तीने भर कार्यक्रमात त्याला चप्पल फेकून मारली. दर्शन त्याच्या आगामी 'क्रांती' चित्रपटाचे प्रमोशन करत असताना ही घटना घडली. दर्शनची गणना कन्नड चित्रपटांतील सर्वात वादग्रस्त अभिनेत्यांमध्ये केली जाते. तो अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो.

नेमके काय घडले?
दर्शन आपल्या चित्रपटाच्या टीमसह 'क्रांती' या चित्रपटातील गाणे लाँच करण्यासाठी हजर होता. तेथे चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. अभिनेत्री रचिता राम कार्यक्रमात आलेल्या प्रेक्षकांशी संवाद साधत असताना तिच्या शेजारी उभ्या असलेल्या दर्शनला एका व्यक्तीने चप्पल मारली. ती चप्पल दर्शनच्या खांद्याला लागली. ही घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला. दर्शनवर चप्पल फेकणाऱ्याला अटक करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

कार्यक्रमात नेमके काय घडले पाहा व्हिडिओत...

दर्शन काय म्हणाला होता?

दर्शनला चप्पल मारण्यामागील कारण त्याने नुकतेच दिलेले वादग्रस्त विधान असल्याचे सांगितले जाते. दर्शनने एका मुलाखतीत म्हटले होते की, 'भाग्याची देवी तुमचा दरवाजा वाजवत नाही, जर तिने दार वाजवले तर तिला पकडून खोलीत ओढत न्या आणि तिथे तिचे सर्व कपडे काढा.' या विधानामुळे लोक दर्शनवर प्रचंड संतापले असून ते अभिनेत्यावर जोरदार टीका करत आहेत. यानंतर अनेक प्रमुख वृत्तवाहिन्यांनी दर्शनच्या 'क्रांती' चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटवर बहिष्कार टाकला.

दर्शन सध्या 'क्रांती' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. वी हरिकृष्णा दिग्दर्शित हा चित्रपट 26 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात दर्शनसह रचिता राम, रविचंद्रन आणि सुमलता यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

बातम्या आणखी आहेत...