आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉकडाउन नाईलाज:वडिलांच्या निधनानंतर दोन दिवसांनी शनिवारी रात्री उशिरा घरी पोहोचली कन्या रिद्धिमा, ऋषींच्या पाली येथील घरी झाली प्रेअर मीट

मुंबई3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो इन्स्टाग्रावरून साभार - Divya Marathi
फोटो इन्स्टाग्रावरून साभार
  • बॉलिवूडचे अभिनेते ऋषी कपूर यांचे 30 एप्रिल रोजी निधन झाले होते, लॉकडाउनमुळे मुलगी रिद्धिमी अंत्यसंस्काराला येऊ शकली नाही

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांचे 30 एप्रिल रोजी निधन झाले. त्यावेळी त्यांची मुलगी रिद्धिमी कपूर दिल्लीत होती. लॉकडाउनमुळे ती आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्कारात सामील होऊ शकली नाही. नंतर रिद्धिमा यांना दिल्ली प्रशासनाकडून मुंबईला जाण्यासाठी विशेष परवानगी मिळाली. रिद्धीमा 1 मे रोजी सकाळी दिल्लीहून रस्तेमार्गाने मुंबईसाठी रवाना झाली होती. तब्बल 36 तासांत 1400 किमी प्रवास करून शनिवारी रात्री उशिरी मुंबईत पोहोचली. 

मुलगी आल्यानंतर झाली प्रेअर मीट

ऋषी कपूर यांच्या निधनानंतर चौथ्या दिवशी त्यांच्या पाली येथील घरी प्रेअर मीट झाली. याचा एक फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये ज्यामध्ये रणबीर नीतू कपूरसोबत बसलेला दिसत आहे. या दोघांमध्ये दिवंगत अभिनेता ऋषी कपूर फोटो ठेवलेला दिसत आहे. रिद्धिमा या प्रेअर मीटच्या काही वेळापूर्वीच घरी पोहोचली होती

फेसटाइमद्वारे घेतले अंत्यदर्शन 

रिद्धिमाने तिचे वडील ऋषी कपूर यांचे शेवटचे दर्शन फेसटाइम कॉलद्वारे केले होते. आलिया भट्टने रिद्धिमीला कॉल करून तिच्या वडिलांचे अंत्यदर्शन करण्यात मदत केली होती. रिद्धिमासोबत तिची मुलगी समारा सुद्धा होती. रिद्धिमाने प्रवासादरम्यान आपली आणि वडिलांचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले. 

बातम्या आणखी आहेत...