आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामॉडेल आणि मल्याळम अभिनेत्री सहानाचा गूढ मृत्यू झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सहानाचा मृतदेह तिच्या घराच्या बाथरूममध्ये सापडला होता. सहानाने तिच्या मृत्यूच्या एक दिवस आधी तिचा वाढदिवस साजरा केला. सहानाच्या पालकांनी आरोप केला आहे की, घरगुती त्रास दिल्या जात होता. या प्रकरणी पोलिसांनी सहानाचा पती सज्जाद याला ताब्यात घेतले आहे.
माझी मुलगी आत्महत्या करणार नाही : सहानाची आई
सहानाच्या आईने मीडियाला सांगितले की, माझी मुलगी सहाना आत्महत्या करण्यासारखी नाही. तिची हत्या करण्यात आली आहे. ती नेहमी माझ्याकडे तक्रार करायची की, तिचा नवरा सज्जाद तिला मारहाण करतो आणि तिला योग्य जेवनही देत नाही. दारू पिऊन तो तिच्यावर अत्याचार करायचा. सज्जादसोबत त्याची बहीण आणि त्याचे आई-वडीलही देखील तिला त्रास द्यायचे. मी तिला सांगितले की, तू त्याच्यापासून वेगळे होऊन एकटे राहा, मात्र त्याआधी तिची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून माझ्या मुलीला न्याय द्यावा.
नवरा बेरोजगार होता
याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, सज्जाद हा पूर्वी कतारमध्ये काम करायचा पण सध्या तो बेरोजगार आहे. तो सध्या सहानासोबत कोझिकोड येथे भाड्याच्या घरात राहत होता. नुकतेच सहानाने एका चित्रपटात काम केले. चित्रपटात अभिनयासाठी सहानाला मिळणाऱ्या पैशावरून पती-पत्नीमध्ये वाद झाल्याचे बोलले जात आहे.
सज्जादने मदतीसाठी दिली हाक: घरमालक
सहानाच्या घरमालकाने सांगितले की, मला सज्जादचा आवाज ऐकू आला आणि मी घराकडे धाव घेतली. मी घरात शिरताच त्यांची पत्नी मांडीवर पडलेली दिसली. मी तिला विचारल्यावर काय झाले तिने उत्तर दिले नाही. मी तिला दवाखान्यात जायला सांगितले. मग आम्ही पोलिसांना फोन केला आणि ते पाच मिनिटांत पोहोचले.
कौटुंबिक छळाविरोधात तक्रार दाखल करायची होती
सहाना कोझिकोडमध्ये राहत होती. सहाना आणि सज्जाद यांचे दीड वर्षापूर्वी लग्न झाले होते. काही दिवसांपूर्वीच सहानाला कौटुंबिक छळाची तक्रार करायची होती, परंतु सज्जादच्या मित्रांच्या समजूतीने तिने तक्रार नोंदवली नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.