आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेम कायमचे हरवले:दीप सिद्धूच्या आठवणीत गर्लफ्रेंड रीना रायने शेअर केली इमोशनल पोस्ट, म्हणाली - मी पूर्णपणे तुटलेय मनातूनही मेले आहे

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्लीज तू परत ये...

पंजाबचा प्रसिद्ध अभिनेता दीप सिद्धू याचा 15 फेब्रुवारी रोजी एका रस्ते अपघातात मृत्यू झाला. या अपघातावेळी दीपची मैत्रीण रीना रायही त्याच्यासोबत होती, मात्र दीपचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर रीना थोडक्यात या अपघातातून बचावली आहे. हरियाणातील सोनीपतमधील खारखोडाजवळ KMP एक्स्प्रेसवेवर मंगळवारी संध्याकाळी हा भीषण अपघात झाला. यानंतर रीनाने तिच्या सोशल मीडियावर दीपसोबतचा एक फोटो शेअर करत भावूक नोट लिहिली आहे.

प्लीज तू परत ये...
रीनाने तिच्या सोशल मीडिया पोस्टवर लिहिले की, ‘मी पूर्णपणे तुटलेय. मी मनातूनही मेले आहे. दीप तू प्लिज परत येत आणि तुझ्या जोडीदाराला भेट. तू मला वचन दिले होते तू मला आयुष्यभर सोडून नाही जाणार. आय लव्ह यू मेरी जान, माझा आत्मा. तू माझ्या ह्रदयाचा आवाज आहेस. मी येथे हॉस्टिपलमध्ये अंथरुणात खितपत पडलेली असताना मला सारखे वाटते की तू येशील आणि हळूच माझ्या कानात आय व्हव यू मेरी जान म्हणशील आणि आपण दोघे कायम सोबत असू… आपण एकत्र आपल्या भविष्याचा विचार करत होतो आणि तू निघून गेलास. जोडीदार कधीच एकमेकांना सोडून जात नाहीत, मी तुला एका दुसऱ्या टोकावर भेटेन,’ अशा शब्दांत रीनाने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.

रीना 13 तारखेला अमेरिकेतून भारतात आली होती
रीन राय 13 फेब्रुवारीला तिचा बॉयफ्रेंड दीप सिद्धूसोबत व्हॅलेंटाईन साजरा करण्यासाठी अमेरिकेतून भारतात आली होती. या अपघातात रीनाला किरकोळ दुखापत झाली असून ती बेशुद्ध झाली होती. त्यानंतर तिला खरखोडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. दीपच्या मृत्यूची माहिती तिला सोशल मीडियावरून मिळाली होती.

कोण आहे रीना राय?
रीनाचे पूर्ण नाव राजविंदर कौर आणि वडिलांचे नाव अमरजित सिंग आहे. सध्या रीना उर्फ ​​राजविंदर ही मुंबईतील ओम कॅसल गुलमोहर जुहू क्रॉस रोड येथे राहत होती. तिथला पत्ताही पोलिस एफआयआरमध्ये नोंदवण्यात आला आहे. या अपघातात तिला दोन ठिकाणी जखमा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...