आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंजाबचा प्रसिद्ध अभिनेता दीप सिद्धू याचा 15 फेब्रुवारी रोजी एका रस्ते अपघातात मृत्यू झाला. या अपघातावेळी दीपची मैत्रीण रीना रायही त्याच्यासोबत होती, मात्र दीपचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर रीना या अपघातातून थोडक्यात बचावली. हरियाणातील सोनीपतमधील खारखोडाजवळ KMP एक्सप्रेसवेवर मंगळवारी संध्याकाळी हा भीषण अपघात झाला. आता दीप आणि रीनाचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो व्हॅलेंटाईन डेचा आहे. रीना दीपसोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी अमेरिकेहून भारतात आली होती.
व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी रीनाने दीपसोबतचा एक फोटो शेअर केला होता. निधनाआधी दीपने गर्लफ्रेंडसोबत चांगला वेळ व्यतित केला होता हे या फोटोमध्ये दिसून येत आहे.
व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने रीनाने एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये दोघेही खूप आनंदी दिसत होते. काही महिन्यांपूर्वी दीपनेही रीनासाठी एक भावनिक पोस्ट लिहिली होती. दीपने रीनासोबतचा एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले होते की, "संपूर्ण जग माझ्या विरोधात असताना तू माझ्या पाठीशी उभी राहिलीस, तू मला सुरक्षित ठेवलेस, माझा आदर केलास, मला शक्ती दिलीस, माझ्या स्वातंत्र्यासाठी प्रार्थना केलीस.'
पुढे तो म्हणाला होता, "पण माझ्या मनाला भिडणारी गोष्ट म्हणजे तू माझ्यासाठी तुझं आयुष्य थांबवलंस. तुझे इथे असणे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे. तुमचे प्रेम आणि समर्थन शब्दांहून अधिक आहे. माझ्याकडे तुझ्यासाठी शब्द नाहीत आणि तुझ्यासारखी व्यक्ती माझ्या आयुष्यात आली यासाठी मी स्वतःला नशीबवान समजतो. मला एवढेच सांगायचे आहे की माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे."
कारची एअरबॅग फुटल्याने झाला दीपचा मृत्यू
दीप पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून प्रवास करत होता. रिपोर्ट्सनुसार, त्याच्या एसयूव्हीचा वेग 100 ते 120 किमी प्रति तास इतका असेल. या धडकेत ट्रकच्या चेसीसचे पूर्ण नुकसान झाले असून त्याचे टायर फुटले. ही टक्कर इतकी जोरदार होती की एसयूव्हीच्या उजव्या बाजूचे पूर्ण नुकसान झाले. अपघाताच्या वेळी दीपच्या बाजूची एअरबॅग उघडल्यानंतर फुटली होती आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. रीनाबद्दल सांगायचे तर तिने सीट बेल्ट लावला होता. त्यामुळे गाडीचा अपघात झाल्यानंतर तिची एअरबॅग उघडली आणि ती फुटली नाही. रीनाचे डोके आणि छातीचा काही भाग एअरबॅगला आदळल्याने तिचा जीव वाचला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.