आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्ल्ड प्रीमियर:युट्यूबवर प्रदर्शित होतोय ‘कच्चे दिन’, दीपक दोब्रीयाल स्टारर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मजुरांचा प्रश्न आणि त्यांचे स्थलांतर या विषयावर बेतलेली शॉर्टफिल्म ‘कच्चे दिन’चा वर्ल्ड प्रीमियर 22 मे रोजी दुपारी 12 वाजता यूट्युबवर होणार आहे.

आज कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर मजुरांचा प्रश्न आणि त्यांचे स्थलांतर ऐरणीवर आले असताना बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्माते शैलेंद्र सिंग यांचा याच विषयावर बेतलेला लघुपट ‘कच्चे दिन’ युट्युब चॅनेलवरून शुक्रवारी 22 मे रोजी प्रीमियरच्या माध्यमातून प्रदर्शित होत आहे. एका स्थलांतरित टॅक्सी ड्रायव्हरची ही कथा असून त्यात मुंबईच्या अनेक छटा टिपल्या गेल्या आहेत. 

‘कच्चे दिन’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. दोन वेळचे जेवण मोठ्या मुश्किलीने मिळेल एवढे तुटपुंजे कमावणाऱ्या टॅक्सी ड्रायव्हरची भूमिका अभिनेता दीपक दोब्रीयालने केली असून यात एक अगदी वेगळी अशी खिळवून ठेवणारी कथा साकारली गेली आहे. या शहरातील विविध छटांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या या स्थलांतरित टॅक्सीचालकाचा एका पोलिसाशी, एका दलालाशी आणि  त्याच्या मैत्रिणीशी सामना होतो. त्याच्या टॅक्सीमध्ये राहिलेल्या एका टिफीनच्या माध्यमातून आयुष्य बदलून टाकणाऱ्या अशा एका घटनेला तो समोर जातो. काहीशी गुंतागुंतीची पण खिळवून ठेवणारी ही कथा उत्तरोत्तर अधिकाधिक रंजक बनत जाते. त्याचबरोबर मुंबई या ‘मॅक्झीमम सिटी’चे अर्धे कच्चे अंगही चित्रपट प्रेक्षकांसमोर आणतो. 

दीपक दोब्रीयालबरोबरच यशपाल शर्मा, अश्रूत जैन, टीना सिंग यांच्या भूमिकाही या लघुपटात आहेत. या लघुपटाने अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये वाहवा मिळविली आहे.  2018 च्या दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवामध्ये या चित्रपटाला प्रोत्साहनपर विशेष महोत्सव पारितोषिक मिळाले होते. 2018 च्या ‘नॉर्दन व्हर्जिनिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये चित्रपटाने ‘सर्वोत्कृष्ट फॉरेन फिल्म’ आणि ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ हे पुरस्कार मिळवले आहेत. ‘व्हर्जिन स्प्रिंग सिनेफेस्ट’मध्ये लघुपटाला ‘सर्वोत्कृष्ट लघुपट’ हा बहुमान मिळाला होता. 

या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर तुम्ही www.youtube.com/shailendrasinghfilms या यूट्युब वाहिनीवरून 22 मे रोजी दुपारी 12 वाजता पाहू शकता.

बातम्या आणखी आहेत...