आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नववर्षाच्या स्वागतासाठी राजस्थानमध्ये पोहोचले स्टार्स:रणबीर कपूर-आलिया आणि दीपिका-रणवीर सिंह जयपूरमध्ये दाखल, रणथंभौरमध्ये सेलिब्रेट करु शकतात न्यू इयर

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यासह नीतू कपूर या देखील जयपूरमध्ये पोहोचल्या.

बॉलिवूड स्टार्स मंगळवारी राजस्थानमध्ये पोहोचले. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह सर्वप्रथमजयपूर विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर काही मिनिटांनी आलिया भट्ट, रणबीर कपूर, नीतू कपूर यांनाही विमानतळावर स्पॉट केले. हे सर्व एकाच विमानाने मुंबईहून जयपूरला पोहोचले.

यानंतर ते वेगवेगळ्या कारने सवाईमाधोपूरकडे रवाना झाले. यावेळी काही लोक त्यांना रिसीव्ह करण्यासाठी पोहोचले. बॉलिवूड स्टार्स विमानतळावर कोणाशीही बोलले नाहीत. ते विमानतळावरुन कारमध्ये बसून निघून गेले. हे सर्व जण सवाई माधोपूरमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामाला असतील. त्यांच्यासोबत आलेली टीमही सवाई माधोपूरला रवाना झाली.

असे म्हटले जाते की हे सर्व कलाकार रणथंभौर येथे न्यू इयर साजरे करतील. तथापि, याबद्दल अधिकृत माहिती उपलब्ध नाही. अशी चर्चा आहे की बॉलिवूडचे सर्व स्टार्स रणथंभौर येथे एका खासगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले आहेत, परंतु याबाबतही अधिकृत माहिती मिळालेली नाही. लॉकडाऊननंतर रणथंभौर नॅशनल पार्क पर्यटकांसाठी 1 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आले आहे.

जयपूर विमानतळावरून बाहेर येताना दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह
जयपूर विमानतळावरून बाहेर येताना दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह

दीपिका आणि रणवीर मॅचिंग ड्रेसमध्ये दिसले
दीपिका आणि रणवीर जयपूर एअरपोर्टवर मॅचिंग आउटफिटमध्ये दिसले. यावेळी दीपिकाने जंप सूटच्या वर लाँग कोट आणि लेदर शूज घातले होते. दीपिकाच्या ड्रेसशी मॅच करणारे चेक स्वेटर, ओवर कोट आणि ब्राउन ट्राऊजरमध्ये रणवीर दिसला.

अंबानी परिवाराने दिवाळी साजरी केली
दिवाळीनिमित्त उद्योगपती अनिल अंबानी सवाई माधोपूरला पोहोचले होते. येथे त्यांनी रणथंभौर नॅशनल पार्कला भेट दिली होती. अंबानी कुटुंब तिथे 3 ते 4 दिवस वास्तव्याला होते. अनिलसोबत पत्नी टीना अंबानी आणि त्यांची दोन्ही मुलेही होती.

बातम्या आणखी आहेत...