आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दीपिकाचं स्टारडम:प्रभाससोबतच्या आगामी चित्रपटासाठी दीपिका पदुकोणला मिळाले 20 कोटींचे मानधन, प्रभासच्या करिअरचा हा 21 वा चित्रपट

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा चित्रपट प्रभासच्या करिअरचा 21 वा चित्रपट असून त्याच्यासोबत दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
  • हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलगू या तीन भाषांत प्रदर्शित होईल

अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. अभिनेता प्रभाससोबतच्या आगामी चित्रपटासाठी तिला तब्बल 20 कोटींचे मानधन दिले जाणार आहे.  तीन दिवसांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. दीपिका खरं तर आपल्या चित्रपटांसाठी लीड अॅक्टरच्या बरोबरीने मानधन घेत असते. मात्र या चित्रपटासाठी प्रभासला तब्बल 50 कोटी रुपये मिळाले आहेत, मात्र दीपिकाला 20 कोटींच्या मानधनासह या चित्रपटात कास्ट केले गेले आहे. 

दीपिकाशिवाय या अभिनेत्री आहेत हाइएस्ट पेड  

कंगना रनोटफी  - 27 कोटी
दीपिका पदुकोणफी - 26 कोटी
श्रद्धा कपूर  फी - 23 कोटी  
आलिया भट्टफी - 22 कोटी
प्रियांका चोप्रा  फी - 21 कोटी 
करीना कपूर खानफी - 20 कोटी
कतरिना कैफफी - 18 कोटी
  • दीपिकाच्या स्टारडममुळे कथा बदलली

चित्रपटात दीपिका साकारत असलेल्या भूमिकेचे महत्त्व प्रभासच्या भूमिकेपेक्षा कमी होते. मात्र दीपिकाचे नाव चित्रपटासाठी अंतिम झाल्यावर तिच्या स्टारडममुळे कथेत बदल करण्यात आला. या चित्रपटाची निर्मिती पूजा दत्ताच्या वैजयंती प्रॉडक्शनने केली आहे. वैजयंती प्रॉडक्शन हाऊस साऊथ सिनेमात 50 वर्षे पूर्ण करत आहेत. दिग्दर्शक नाग अश्विन यांच्या सायन्स फिक्शन फिल्म वर्ल्ड वॉर 3 वर चित्रपटाचे कथानक बेतले आहे. चित्रीकरणाला 2021च्या एप्रिलमध्ये सुरुवात होईल. 

  • श्रद्धा कपूरनंतर दीपिका दुसरी अभिनेत्री

प्रभासबरोबर काम करणारी दीपिका बॉलिवूडची दुसरी अभिनेत्री आहे. याआधी श्रद्धा कपूर साहोमध्ये प्रभाससोबत काम केले होते. चित्रपटाची घोषणा होताच दीपिका आणि प्रभासने सोशल मीडियावरही एकमेकांना फॉलो करण्यास सुरुवात केली आहे. दीपिका रणवीर सिंगसोबत '83' चित्रपटात दिसणार आहे. मात्र, कोरोनामुळे 83 ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. तर दुसरीकडे 'राधे-श्याम'मध्ये पूजा हेगडेसोबत प्रभास दिसणार आहे.