आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या कुटुंबासोबत भूतान ट्रीपवर आहे. दीपिकानं भूतानमधील अनेक ठिकाणी भेट दिली. या ट्रीपचे काही फोटोज दीपिकाच्या फॅन पेजने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. काही फोटोत दीपिका आपल्या चाहत्यांसोबत सेल्फी घेताना दिसत आहे.
दीपिकाने भूतानच्या युअर कॅफे रेस्तराँला भेट दिली होती. या रेस्तराँच्या इन्स्टाग्राम पेजवर दीपिकाचे काही फोटो शेअर करण्यात आले. या फोटोमध्ये दीपिका ही रेस्तराँच्या स्टाफसोबत दिसत आहे. 'तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सर्व्ह करण्याची संधी आम्हाला मिळाली, याचा आम्हाला आनंद वाटतो', असे कॅप्शन या फोटोला देण्यात आले आहे.
mrajasegaran नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये दीपिका आणि तिची एक फॅन दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देण्यात आले, 'मी तिच्या प्रायव्हसीचा आदर केला. जेव्हा ती एका फोटोसाठी तयार होती तेव्हा ती माझ्याकडे आली आणि फोटो काढला. ती स्क्रीनवर जेवढी छान आहे तेवढीच ऑफ स्क्रीन देखील छान आहे.'
दीपिका आणि तिच्या फॅनचा हा फोटो टायगर्स नेस्ट- किंगडम ऑफ भूतान येथील आहे. या फोटोमध्ये दीपिका नो-मेकअप लूकमध्ये दिसत आहे.
दीपिकाचे चित्रपट
जानेवारी महिन्यात प्रदर्शित झालेला दीपिकाचा 'पठाण' हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. चित्रपटाने वर्ल्डवाइड 1000 कोटींहून अधिकचा व्यवसाय करत इतिहास रचला. आता दीपिकाचा 'फायटर' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात हृतिक रोशन आणि अनिल कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच तिच्याकडे प्रभाससोबतचा 'प्रोजेक्ट के' आणि 'द इंटर्न' हे चित्रपटही आहेत. 'प्रोजेक्ट के'मध्ये दीपिका अमिताभ बच्चन आणि प्रभास यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.