आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बर्थडे पार्टी:दीपिकाच्या वाढदिवसाच्या पार्टीत रणबीर-आलियासह पोहोचले सेलेब्स दिसले, व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर झाले व्हायरल

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्व सेलिब्रिटींनी पार्टी दरम्यान मास्क घातला होता.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने मंगळवारी आपला 35 वा वाढदिवस पती रणवीर सिंह आणि काही जवळच्या मित्रांसह साजरा केला. तिच्या वाढदिवसाच्या पार्टीत रणबीर कपूर, आलिया भट्ट, करण जोहर, अनन्या पांडे, ईशान खट्टर यांच्यासह अनेक सेलेब्स उपस्थित होते. दीपिकाच्या या वाढदिवसाच्या पार्टीचे व्हिडिओ आणि फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रणवीरने दीपिकाची बर्थडे पार्टी मुंबईतील एका रेस्तराँमध्ये ठेवली होती.

दीपिकाने रणवीरसोबत केक कापला. दोघांनी बरेच फोटो एकत्र क्लिक केले. सर्व सेलिब्रिटींनी पार्टी दरम्यान मास्क घातला होता. या पार्टीपूर्वी दीपिका दुपारी पती रणवीरबरोबर ब्रेकफास्ट डेट म्हणजेच ब्रंचसाठी गेली होती. त्यानंतर दोघेही शॉपिंग करण्यासाठी वांद्रे मार्केटमध्येही पोहोचले होते. त्यांचे शॉपिंगचे फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

वाढदिवसाच्या निमित्ताने रणवीरने दीपिकासोबतचा एक रोमँटिक फोटोही शेअर केला होता. फोटो शेअर करुन रणवीरने त्याला कॅप्शन दिले, 'बीवी नंबर 1.'

याशिवाय रणवीरने दीपिकाच्या बालपणीचा फोटोही शेअर केला होता. हा फोटो शेअर करत त्याने रोमँटिक अंदाजात लिहिले होते, "माझा जीव, माझे आयुष्य, वाढदिवसाच्या शुभेच्छा."

बातम्या आणखी आहेत...